कपिल शर्मा, राजपाल यादव, सुगंधा मिश्रा, रेमो डिसूजा यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याच्या धमक्या!

Death Threat | सर्वांना ई-मेलद्वारे मिळाला धमकीचा संदेश
Death Threat
अभिनेत्यांना धमकी मिळण्याचे सत्र सुरुचPudhari Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॉमेडियन कपिल शर्मा आणि राजपाल यादव यांना धमकीचा ईमेल पाठवण्यात आला आहे. हा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात संशय पोलिसांना आहे. या दोन स्टार्स व्यतिरिक्त सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांनाही धमक्या मिळाल्या आहेत. या घटनेबाबत पोलिसांनी तक्रार नोंदवली आहे.

सुरुवातीच्या तपासात काय उघड झाले?

अभिनेता राजपाल यादव, विनोदी कलाकार कपिल शर्मा, सुगंधा मिश्रा आणि रेमो डिसूझा यांना मिळालेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे आणि तपास सुरू आहे. या स्टार्सना ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने धमकी दिली आहे की जर आठ तासांच्या आत या स्टार्सकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर कारवाई केली जाईल. अहवालानुसार, प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आला होता.

स्टार्सच्या जवळच्या मित्रांना आणि कुटुंबाला लक्ष्य करण्यात आले

ईमेलमध्ये केवळ या स्टार्सनाच नाही तर त्यांच्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. या प्रकरणी मुंबईतील अंबोली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 351 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस तपासानुसार, ईमेलचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानचा आहे. सध्या या स्टार्स किंवा त्यांच्या कुटुंबियांकडून या संदर्भात कोणतेही विधान जारी केलेले नाही.

ईमेलमध्ये काय म्हटले होते?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा धमकीचा ईमेल विष्णू नावाच्या व्यक्तीने पाठवला आहे. त्यात म्हटले आहे की, 'आम्ही हे सर्व पब्लिसिटी स्टंट म्हणून करत नाही आहोत. तुमच्या सर्व हालचालींची माहिती आमच्याकडे आहे. आम्हाला पुढील 8 तासांत तुमच्याकडून त्वरित प्रतिसाद अपेक्षित आहे. जर आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही, तर आम्ही असे गृहीत धरू की तुम्ही हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आहात - विष्णू. पोलिस आयपी अॅड्रेस आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे याचा तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news