Kichcha Sudeep Mother Dies: कन्नड अभिनेता किच्चा सुदीपला मातृशाेक

सरोजा यांना अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास होता
kannada actor kiccha sudeep mother saroja sanjeev passes away
कन्नड अभिनेता किच्चा सुदीपला मातृशाेक File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन :

कन्नड अभिनेता आणि टेलिव्हिजन होस्ट किच्चा सुदीप यांच्या आई सरोजा संजीव यांचे आज (रविवार), 20 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. सरोजा यांना अनेक दिवसांपासून प्रकृतीचा त्रास होत होता.

वयोमानानुसार सरोजा यांना अनेक प्रकृतीच्या समस्‍या निर्माण झाल्‍या होत्‍या. त्‍यांना श्वास घेण्यात त्रास जाणवत होता. त्‍यामुळे त्‍यांना तात्‍काळ रूग्‍णालयात दाखल करण्यात आले होते. त्‍यांच्यावर योग्‍य पद्धतीने उपचार सुरू होते मात्र तरीही त्‍यांना वाचवता आले नाही.

अभिनेता किच्चा यांच्या आईचे पार्थिव जेपी नगर येथील त्‍यांच्या निवासस्‍थानी आजच (२० ऑक्‍टोबर) रूग्‍णालयातून आणण्यात येणार आहे. या ठिकाणी सर्व तयारी करण्यात आली असून, त्‍यांच्या निवासस्‍थानीच सर्व आप्त परिवारातील लोक श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. यानंतर सरोजा यांच्यावर सायंकाळी ५ वाजता विल्‍सन गार्डन येथील स्‍मशान भूमीत अंत्‍यसंस्‍कार करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news