Jr NTR : ज्युनिअर एनटीआरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे प्रकरण?

२२ डिसेंबर रोजी औपचारिक आदेश देण्‍याची उच्‍च न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती
Jr NTR : ज्युनिअर एनटीआरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे प्रकरण?
Published on
Updated on

High Court on Jr NTR personality rights

नवी दिल्‍ली : एनटीआर ज्युनियर म्हणून प्रसिद्ध असलेले दाक्षिणात्‍य अभिनेता नंदमुरी तारका रामा राव ज्युनियर यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमवारी त्‍यांनी दाखल केलेल्‍या याचिकेवर न्‍यायालयाने महत्त्‍वपूर्ण निर्णय दिला.

काय आहे प्रकरण?

एनटीआर ज्युनियर व्यक्तिमत्त्व हक्कांचे (नावाचा आणि फोटोचा अनधिकृत वापर) उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. एनटीआर ज्युनियर यांचा व्यक्तिमत्व हक्क दावा वकील शिव वर्मा यांच्यामार्फत दाखल करण्यात आला होता. यावर सोमवारी (दि.८) न्यायाधीश मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्‍या एकल खंडपीठासोमर या याचिकेवर सुनावणी झाली.

Jr NTR : ज्युनिअर एनटीआरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे प्रकरण?
Vande Mataram discussion : नेहरू 'मुस्‍लिम लीग'ला शरण गेले, काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे तुकडे केले: PM मोदींचा घणाघात

व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाल्‍याचा दावा

एनटीआर ज्युनियरच्‍या वतीने वरिष्ठ वकील जे साई दीपक यांनी युक्‍तीवाद केला. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि सोशल मीडिया साईट्सवर अनेक आक्षेपार्ह आणि अनधिकृत सामग्री उपलब्ध आहे, ज्यामुळे एनटीआर ज्युनियरच्‍या यांच्‍या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन होत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आदेश

ज्युनियर एनटीआर यांच्या याचिकेला 'माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया आचारसंहिता) नियम २०२१' (Information Technology (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021) अंतर्गत तक्रार समजावे. तसेच यावर तीन दिवसांच्या आत आवश्यक ती कारवाई करावी, असा आदेश न्‍यायाधीश मनमीत प्रीतम सिंग यांनी दिला.

Jr NTR : ज्युनिअर एनटीआरला हायकोर्टाचा मोठा दिलासा, काय आहे प्रकरण?
Vande Mataram discussion : पंतप्रधान मोदींनी जातीयवाद्यांना दोष देणारी नेहरूंची ओळ का वगळली ? : प्रियांका गांधींचा सवाल

पुढील तारखेला औपचारिक आदेश देऊ : न्‍यायालयाची स्‍पष्‍टोक्‍ती

न्यायालयात आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ डिसेंबर रोजी होणार आहे. या दिवशी ज्युनियर एनटीआर यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांवर एक सर्वसमावेशक (Comprehensive) आदेश जारी केला जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. "आम्ही पुढील तारखेला औपचारिक आदेश देऊ," असे न्यायमूर्ती अरोरा यांनी नमूद केले. दरम्‍यान, यापूर्वी २७ नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेते अजय देवगण यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांच्या केसमध्ये सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले होते की, कोर्टात येण्यापूर्वी पक्षकारांनी २०२१ च्या आयटी नियमांनुसार (IT Rules) उपलब्ध असलेल्या वैधानिक उपायांचा (Statutory Remedies) प्रथम उपयोग करावा. बदनामीकारक आणि अपमानजनक सामग्री हटवण्यासाठी सोशल मीडिया मध्यस्थांकडे तक्रार करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news