'एक राष्ट्र, एक निवडणूक'वर 'जेपीसी'ची मंगळवारी महत्त्‍वाची बैठक

One Nation, One Election : चार सत्रांमध्‍ये हाेणार चर्चा
One Nation, One Election
प्रातिनिधिक छायाचित्र. File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बहुचर्चित 'एक राष्ट्र, एक निवडणूक' विषयावरील संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मंगळवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत बैठक होणार आहे. या विषयावर २५ मार्च रोजी, जेपीसीने महत्त्वाची बैठक घेतली होती.

चार सत्रांमध्‍ये होणार चर्चा

'एएनआय'ने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, 'एक राष्ट्र, एक निवडणूक' विषयावरील 'जेपीसी' बैठकीच्‍या पहिल्‍या सत्रात सर्वोच्‍च न्‍यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांच्याशी संवाद साधला जाईल. जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एसएन झा यांच्याशी चर्चा केली जाईल. पुढील सत्रात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि भारताच्या २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बीएस चौहान तर शेवटच्‍या सत्रात राज्यसभा सदस्य आणि ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांच्‍याशी जेपीसी चर्चा करणार आहे.

सर्वांचे मते जाणणे शक्‍य होणार

'एक राष्ट्र, एक निवडणूक'वरील 'जेपीसी' वेबसाइटच्या अनावरणाबद्दल बोलताना संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्ष पीपी चौधरी म्‍हणाले की, "समितीने दोन प्रमुखबाबींवर निर्णय घेतले आहेत. यासंदर्भातील जाहिरात वेबसाईटवर सर्व भाषांमध्ये छापली जाणार आहे. या माध्‍यमातून सर्वांचे मते जाणणे शक्‍य होणार आहे. क्यूआर कोड सुविधेसह वेबसाइट लवकरच लाँच केली जाईल. सूचना गोळा केल्या जातील. या सूचनांचा खासदार आढावा घेणार आहेत."

'जेपीसी' करणार राज्‍यांचे दौरे, पहिला दौरा महाराष्‍ट्र राज्‍याचा

संयुक्त संसदीय समिती सर्व राज्यांना भेट देणार आहे. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' यावर सर्व राज्‍यांची मते जाणून घेणार आहे. पहिला दौरा महाराष्‍ट्र राज्‍याचा केला जाणार आहे. मे महिन्यात उत्तराखंड दौर्‍याचे नियोजन आहे. जम्मू आणि काश्मीर, चंदीगड (पंजाब आणि हरियाणा यांचा समावेश)मध्‍ये जूनमध्ये दौरा होईल.यानंतर अन्‍य राज्‍यांच्‍या दौर्‍याचे नियोजन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news