Vijay Divorce Case: विजय यांच्यावर पत्नीनं केला 'त्या' अभिनेत्रीसोबत 'विवाहबाह्य संबंध' ठेवल्याचा आरोप; प्रकरणाला वेगळं वळण

Vijay Divorce Case
Vijay Divorce Casepudhari
Published on
Updated on

Joseph Vijay Divorce Case: तमिळ नाडूचे मुख्यमंत्री आणि अभिनेता जोसेफ विजय आणि त्यांची पत्नी संगिता सोरनालिंगम हे आज सोमवारी घटस्फोटासाठी बराचकाळ कोर्टात होते. चेंगलपट्टू महिला कोर्टाने या दोघांच्या घटस्फोटासंदर्भातील याचिकेवर ७ ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार घटस्फोट प्रकरणाची सुनावणी सकाळी १०.३० मिनिटांनी सुरू झाली. विजय आणि संगिता दोघेही या सुनावणीवेळी कोर्टात उपस्थित होते. मात्र दोघेही उपस्थित असतानाही सुनावणी पुढे का ढकलली याबाबत संभ्रम होता. संगिता यांनी घटस्फोटाची पीटीशन दाखल केली आहे. त्यांना २७ वर्षांचा संसार संपुष्टात आणायचा आहे.

याचिकेत काय आहे आरोप?

संगिता सोरनालिंगम यांनी अधिकृतरित्या दाखल केलेल्या पीटीशनमध्ये विजय आणि संगिता यांनी १९९८ मध्ये युकेमध्ये नोंदणी पद्धतीनं लग्न केलं होतं. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी पारंपरिक पद्धतीन चेन्नईत लग्न केलं होतं.

या पीटीशनमध्ये संगिता यांनी विजय यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे आरोप केले आहेत. त्यांनी स्पेशल मॅरेज अॅक्ट १९५४ अंतर्गत क्रूररतेचा आरोप केला आहे. या पीटीशनमध्ये विजय यांचे कोणासोबत विवाहबाह्य संबंध होते याचा उल्लेख मात्र केलेला नाही. मात्र हे प्रकरण अभिनेत्री त्रिशा कृष्णन यांच्याशी जोडण्यात येत आहे.

विजयनं आश्वसन पाळलं नाही

याचिकाकर्त्या संगिता यांनी विजय यांनी सतत हे विवाहबाह्य संबंध बंद करण्याचे आश्वासन दिलं. मात्र विजय यांनी अभिनेत्री सोबत प्रवास करणे आणि सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणे सुरूच ठेवलं. संगिताने ही अभिनेत्री या दोघांचे आऊटिंगचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. याला विजय यांची कोणताही हरकत नव्हती. त्यामुळं सार्वजनिकरित्या माझा अपमान झाला भावनिकदृष्या देखील मी आणि माझी मुले तणावात होतो.

म्हणून भावनिकदृष्ट्या लग्नातून माघार

त्यामुळे संगिता यांनी याचिकेत सांगितंल की त्यांनी लग्नातून भावनिकदृष्ट्या माघार घेतली होती. विजय यांच्यासोबत बोलणं देखील कमी केलं. संगिता यांनी विजय यांनी घरातील वातावरण असं करून ठेवलं होतं की त्यांना वेगळ राहण्याचा आणि वेगळं आयुष्य जगण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घ्यावा लागला. विजय यादरम्यान त्यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत होते. याचबरोबर संगिता यांनी विजय यांच्यावर आर्थिक बेशिस्तपणाचा देखील दावा केला. विजय यांनी त्यांच्यावर कडक आर्थिक निर्बंध लादल्याचा, त्यांच्या येण्याजाण्यावर बंधने घातल्याचा देखील आरोप केला आहे.

लग्न वाचवण्याचा प्रयत्न फेल

हे लग्न वाचवण्याचा प्रयत्न फेल गेला आहे. या दोघांमधील शेवटची मिटिंग ही ९ नोव्हेंबर २०२५ मध्ये झाली होती. मात्र त्यातून काही निष्पन्न झालेलं नाही. हे लग्न आता वाचवण्यापलीकडे गेलं आहे. ते फक्त कागदावर अस्तित्वात आहे असं देखील संगिता यांनी सांगितलं.

दरम्यान, २० एप्रिल रोजी या प्रकरणी सुनावणी होणार होती. विजय आणि संगिता यांनी ही तारीख चुकवली. त्यांनी आपल्या वकिलांना सुनावणीवेळी पाठवण्याचा निर्णय़ घेतला. त्यानंतर कौटुंबिक न्यायालयाने १५ जून ही पुढची तारीख दिली होती.

ही हाय प्रोफाईल केस असल्याने दोन्ही बाजूंकडील वकिलांनी सुरक्षेच्या कारणास्तव व्हर्चुअल उपस्थिती दर्शवण्याची विनंती केली आहे. मात्र न्यायालायने ही विनंती फेटाळून लावली त्यामुळं या दोघांनाही कोर्टात प्रत्यक्ष हजेरी लावावी लागली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news