Jharkhand Crime : झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्काऱ्याला दगडांनी ठेचून मारले

चतरामधील बडगाव गावातील घटना; ११ जणांना अटक, परिसरात तणाव
Jharkhand Crime : झारखंडमध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्काऱ्याला दगडांनी ठेचून मारले
file photo
Published on
Updated on

चतरा : झारखंडमधील चतरा जिल्ह्यात बडगाव गावात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या संशयावरून संतप्त जमावाने एका तरुणाची दगडाने ठेचून करून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

सोमवारी संध्याकाळी शौचासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली होती. मंगळवारी सकाळी घरी परतल्यानंतर तिने शेजारी राहणाऱ्या मोहम्मद इम्रोज याने अपहरण करून डांबून ठेवल्याचा आणि बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अत्याचाराची बातमी पसरताच शेकडो ग्रामस्थ इम्रोजच्या घराबाहेर जमा झाले. जमावाने त्याला घरातून ओढून रस्त्यावर आणले आणि काठ्या, लोखंडी रॉड तसेच दगडांनी बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. याशिवाय जमावाने इम्रोजच्या वडिलांना खांबाला बांधून त्याच्या आई-वडिलांनाही मारहाण केली. त्यामध्ये दोघेही जखमी झाले आहेत.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कसाबसा इम्रोजचा बचाव केला आणि त्याला टंडवा सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथून त्याला हजारीबाग येथील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून व्हिडीओ फुटेजच्या आधारे आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news