Jewellery Shops No Entry: सोन्याच्या दुकानात बुरखा, घूंगट ओढलेल्या महिलांना नो एन्ट्री; चेहरा दाखवल्यावरच खरेदी

तुम्हाला कॅमेऱ्यावर तुमचा चेहरा दिसल्यानंतरच दागिने खरेदी करता येणार आहेत.
Jewellery Shops No Entry
Jewellery Shops No Entrypudhari photo
Published on
Updated on

Jewellery Shops No Entry Burqa Ghoonghat: उत्तर प्रदेशातील झांसीमध्ये आता बुरखा आणि घूंगट घालून सोने दुकानदारांना गंडा घालता येणार नाहीये. आता झांसीमध्ये जर तुम्हाला दागिने खरेदी करायचे असतील तर तुम्हाला बुरखा आणि घुंघट न घालताच यावं लागणार आहे. तुम्हाला कॅमेऱ्यावर तुमचा चेहरा दिसल्यानंतरच दागिने खरेदी करता येणार आहेत.

Jewellery Shops No Entry
Kolhapur Crime : व्यावसायिक स्पर्धेतून गुंडांना सुपारी देऊन लूटमार; टोळीला बेड्या

पोलिसांची देखील परवानगी

आता हे झांसी मधील सर्व ज्वेलरी शॉपवर होणार आहे. आता ज्वेलरीच्या प्रत्येक दुकानाबाहेर अशा आशयाची सूचना चिकटवण्यात आली आहे. याला पोलिसांची देखील परवानगी आहे. सीपरी बाजार सराफा व्यापार मंडळाच्या आवाहनानंतर अशा आशयाची सूचना जवळपास प्रत्येक दुकानाबाहेर चिकटवण्यात आली आहे. आता असे आवाहन जिल्ह्यातील इतर बाजारातील सराफा व्यापाऱ्यांना देखील करण्यात येणार आहे.

Jewellery Shops No Entry
Navnath Ban Controversy: माझा मर्डर करा मात्र मागं हटणार नाही... भाजपचे नवनाथ बन अन् 'अपक्ष' लालू भाईंमध्ये माघारीवरून काय झालं?

चेहरा झाकून येतात अन्....

सराफा बाजार मंडळाचे अध्यक्ष उदय सोनी यांनी सांगितलं की, 'काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या महिला चेहरा झाकून खरेदी करण्यासाठी येतात अन् चोरी करून जातात. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद होते. मात्र गुन्हेगाराने बुरखा घातल्यामुळं त्यांचा चेहरा दिसत नाही. त्यामुळं त्यांना पकडणं अवघड होऊन जातं. त्यामुळं पोलिसांकडे महिलांना बिना पर्दा खरेदी करण्याचे आवाहान दुकानाबाहेर चिकटवण्याची परवानगी मागण्यात आली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news