

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये एक दहशतवादी ठार झाला आहे. उधमपूर व किश्तवाड येथे शुक्रवारी राबवलेल्या कोंम्बिंग ऑपरेशनमध्ये हा दहशतवादी ठार झाला. अन्य तिनजणांची शोध मोहिम सुरु असल्याची माहिती सुरक्षादलांनी दिली आहे.
दोडा जिल्ह्यातील भादेवाडा परिसरात सुरक्षा एजन्सीजनी शोध मोहिम राबविली जात होती. त्यावेळी जंगलात दहशतवादी त्यांचे लोकेशन वारंवार बदलत होते. त्यानंतर सैन्यदल व काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहिम राबविली जात होती. यावेळी ठिकाण बदलत असताना त्यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. यामध्ये १ दहशतवादी ठार झाला तर तिघे जंगलात लपले आहेत. त्यांना पकडण्यासाठी शोधमाहिम राबविली जात आहे. दरम्यान एका आर्मी ऑफिसरने सांगितले की दोन्ही बाजूनी जोरदार गोळीबार करण्यात आला. आतापर्यंत एका दहशतवाद्याला निष्प्रभ करण्यात आले आहे.