

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी कुपवाडा येथील बडी मोहल्ला, अमरूई येथे आज (दि.१०) संयुक्त शोध मोहीम सुरू केली. या शोध मोहिमेदरम्यान, एके रायफल्स, दारूगोळा आणि इतर युद्धसाहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई पुढे सुरूच आहे, अशी माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्स पोस्ट करून दिली आहे. (Jammu Kashmir News)