'नापाक' कारवाया सुरुच, पुंछमध्‍ये पाकिस्‍तानी ड्रोनच्‍या घिरट्या

जवानांकडून गोळीबार, ड्रोनबद्दल माहिती देणार्‍यास तीन लाखांचे बक्षीस जाहीर
pakistani drone
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला.Representative image
Published on
Updated on

जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी ड्रोन पाडण्यासाठी लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला. काही काळ भारतीय हद्दीत घिरट्या घालल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा ड्रोन पाकिस्तानात परतल्‍याची माहिती भारतीय लष्‍कराच्‍या सूत्रांनी दिली. दरम्‍यान, ड्रोनबद्दल माहिती देणार्‍यास 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्‍यात आले आहे.

नियंत्रण रेषेचे रक्षण करणाऱ्या भारतीय जवानांना रात्री ९.१५ च्या सुमारास 1,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवर पाकिस्तानी ड्रोनची हालचाल दिसली. त्याला खाली आणण्यासाठी पुढील 10 मिनिटांत पाच राऊंड गोळीबार करण्यात आला, मात्र ते परतण्यात यशस्वी झाले.

pakistani drone
कठुआतील भ्‍याड हल्‍ल्‍यामागे पाकिस्‍तानी दहशतवादी

अर्ध्या तासानंतर पुन्हा ड्रोन दिसले

लष्कराच्या अधिका-यांनी सांगितले की, अर्ध्या तासांनंतर पाकिस्तानी ड्रोन पुन्हा भारतीय हद्दीत घुसल्याचे दिसले. त्यावर आणखी दोनवेळा गोळीबार करण्यात आला, त्यानंतर ते दुसऱ्या बाजूने परतले. ड्रोनमधून कोणतीही शस्त्रे किंवा अंमली पदार्थ सोडले जाऊ नयेत यासाठी लष्कराच्या जवानांनी पहाटेच पुढच्या गावांमध्ये शोध मोहीम सुरू केली.जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सीमेपलीकडून शस्त्रे आणि अंमली पदार्थ सोडण्यासाठी उडवलेल्या ड्रोनबद्दल माहितीसाठी 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

,

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news