

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांचा नातू आराव टोकाचा निर्णय घेत कानपूर येथील निवासस्थानी जीवन संपवले आहे. मंगळवारी ही धक्कादायक घटना समोर आली. याबाबत टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
वृत्तानुसार, आरावच्या खिशात एक ‘सुसाईड नोट’ सापडली आहे. त्या चिठ्ठीत त्याने आपल्या कुटुंबियांना त्याच्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या ‘नोट्स’ तपासण्याची विनंती केली आहे.
नायब राज्यपाल सिन्हा यांचे पुतणे आलोक मिश्रा हे त्यांच्या पत्नी दिव्या, मुलगी मान्या आणि मुलगा आरव यांच्यासह कानपूरमधील कोहना परिसरात राहतात. या दुर्दैवी घटनेने सिन्हा कुटुंबियांवर आणि परिसरात शोककळा पसरली आहे.