जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेसची सत्ता स्‍थापनेकडे वाटचाल

Jammu and Kashmir Election : ९० पैकी ४७ जागांवर आघाडी
Jammu and Kashmir Election 2024
नॅशनल कॉन्‍फरन्‍सचे उपाध्‍यक्ष ओमर अब्‍दुल्‍ला आणि काँग्रेस नेते राहुल गांधी. File photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक मतमोजणीत नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेस आघाडीने आता सत्ता स्‍थापनेकडे वाटचाल केल्‍याचे चित्र आहे. निवडणूक आयोगाने सकाळी 10:15 वाजता जाहीर केलेल्या ट्रेंडनुसार राज्‍यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने ९० पैकी ४७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाजप २१ तर अन्‍य पक्षांनी १७ जागांवर आघाडी घेतली आहे. पीडीपी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.

९० मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या ३ ते ५ फेऱ्या पूर्ण

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जम्‍मू-काश्‍मीरमधील बहुतांश ९० मतदारसंघांमध्ये मतमोजणीच्या ३ ते ५ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सकाळी 10:15 पर्यंत नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडी ४७ जागांवर तर भारतीय जनता पक्ष २८ जागांवर आघाडीवर आहे. जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस, भारत आघाडीतील भागीदारांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवली तर पीडीपी आणि भाजपने स्वबळावर निवडणूक लढवली.

जनादेश भाजपविरोधात असेल : ओमर अब्‍दुला

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीचा विजय होईल. राज्‍यातील मतदारांचा कौल आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल. जनादेश भाजपच्या विरोधात असेल, असे नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.

नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेसचे आघाडी सरकार स्‍थापन होणार

जम्‍मू दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रमण भल्‍ला म्‍हणतात की, जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स-काँग्रेसचे आघाडी सरकार स्‍थापन होणार आहे. आम्‍हाला जनतेचे समर्थन मिळणार अशी अपेक्षा होती. राज्‍यातील जनतेने आम्‍हाला बहुमत दिले आहे.

काँग्रेस नेते जम्‍मू-काश्‍मीरला रवाना

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये प्रारंभीच्‍या मतमोजणीत जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये नॅशनल कॉन्‍फरन्‍स आणि काँग्रेस आघाडीने निर्णायक आघाडी घेतल्‍याचे चित्र आहे. दरम्‍यान, काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्‍नी आणि मुकेश अग्‍निहोत्री जम्‍मू-काश्‍मीरसाठी रवाना झाले आहेत. येथे नॅशनल कॉन्‍फरन्‍सबरोबर सरकार स्‍थापन करण्‍यासाठी चर्चाही सुरु झाली आहे.

सत्ता ही कायमस्वरूपी गोष्ट नाही : इंजिनियर रशीद

जम्‍मू-काश्‍मीरमध्‍ये मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. अवामी इत्तेहाद पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार, शेख अब्दुल रशीद उर्फ ​​इंजिनियर रशीद यांनी 'एएनआय'शी बोलताना सांगितले की, "सत्ता ही कायमस्वरूपी गोष्ट नाही. जम्मू-काश्मीरच्‍या एका बाजूला पाकिस्तान आहे, तर दुसऱ्या बाजूला चीन आहे. शांघाय परिषदेत काश्मीरच्या शांततेसाठी पडद्याआड काहीतरी चांगले केले पाहिजे. जम्मू आणि काश्मीरमध्ये कोणतेही सरकार स्थापन झाले तरी ते जम्मू-काश्मीर आणि नवी दिल्ली यांच्यातील पुलाचे काम करावे लागेल."

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news