

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णाहिकेवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या हल्ल्यास जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशवादी ठार झाला असून दोघांचा शोधासाठी युद्ध पातळीवर शोध मोहिम राबविण्यात आली आहे.
आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) भट्टल भागात लष्कराच्या रुग्णवाहिकेवर गोळीबार केला. . ते भारतीय सैन्य दलाच्या गणवेशात होते. मंदिरात शिकवणीसाठी आलेल्या तीन विद्यार्थ्यांना दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले. मात्र काही वेळाने त्यांनी त्याला सोडले. यानंतर ते जंगलाच्या दिशेने पळून गेले होते. सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तर देत परिसराची घेराबंदी आणि शोध मोहीम सुरू केली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. सूत्रांनी सांगितले की, तीन दहशतवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह सापडले आहेत. परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून पोलीस आणि सुरक्षा दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली आहे.