

isros pslv c61 eos 09 launch mission fails
नवी दिल्ली : भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था (इस्रो)च्या EOS-09 मिशनला रविवारी (18 मे) सकाळी 5:59 वाजता श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण करण्यात आले. PSLV-C61 रॉकेटने EOS-09 उपग्रहाला सूर्य-समकालिक ध्रुवीय कक्षेत (Sun-Synchronous Polar Orbit) स्थापित करण्याचा उद्देश होता. प्रक्षेपणाच्या सुरुवातीच्या दोन टप्प्यांमध्ये सर्व काही सुरळीत होते, परंतु तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे उपग्रह नियोजित कक्षेत पोहोचू शकला नाही आणि मिशन अपयशी ठरले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो)ने एक मोठी मोहीम सुरू केली. रविवारी (दि. 18) श्रीहरिकोटा येथून हे अभियान सुरू करण्यात आले. हे इस्रोचे 101 वे अभियान होते. या मोहिमेत, PSLV-C61 रॉकेटद्वारे EOS-09 नावाचा एक उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. EOS-09 हा पृथ्वी निरीक्षण उपग्रह होता. ते सूर्याभोवती कक्षेत स्थापित करायचे होते परंतु दुर्दैवाने, हे अभियान यशस्वी होऊ शकले नाही. इस्रो प्रमुखांनी सांगितले की पीएसएलव्ही रॉकेटचे चार टप्पे आहेत. पहिल्या दोन टप्प्यांपर्यंत सर्व काही ठीक होते. पण प्रक्षेपणानंतर, तिसऱ्या टप्प्यात तांत्रिक बिघाड आढळून आला, ज्यामुळे मोहीम अपूर्ण राहिली.