ISRO LVM3-M6: ऐतिहासिक क्षण! ISRO चे LVM3 बाहुबली रॉकेट अमेरिकेचा 'वजनदार' सॅटकॉम घेऊन अंतराळात झेपावलं...

बाहुबली रॉकेट अमेरिकेचे कम्युनिकेशन सॅटेलाईट ब्लू बर्ड ब्लॉक - २ घेऊन अंतराळात घेऊन झेपावले.
ISRO LVM3-M6
ISRO LVM3-M6pudhari photo
Published on
Updated on

ISRO LVM3-M6BlueBird Block-2: इस्रोने बुधवारी एक ऐतिहासिक कामगिरी केली. इस्रोचे LVM3-M6 अर्थात बाहुबली रॉकेट अमेरिकेचे कम्युनिकेशन सॅटेलाईट ब्लू बर्ड ब्लॉक - २ घेऊन अंतराळात घेऊन झेपावले. हे मिशन यशस्वी झाल्याचे इस्रोकडून सांगण्यात आलं.

ISRO LVM3-M6
ISRO news | डोंगराळ, दुर्गम भागातही विनाअडथळा इंटरनेट सेवा मिळणार, अमेरिकेचा 'ब्लूबर्ड' उपग्रह अंतराळात झेपावणार

कोणतीही अडचण न येता उड्डाण

जवळपास ४३.५ मीटर उंच असलेल्या LVM3 रॉकेटने आज (२४ डिसेंबर) सकाळी ८.५५ मिनिटांनी श्रीहरीकोटा येथील सतिश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या क्रमांकाच्या लाँच पॅडवरून उड्डाण केले. यापूर्वी त्याने २४ तासाचे काऊट डाऊन पूर्ण केले होते. या रॉकेटमध्ये एस २०० सॉलीड बूस्टर लिक्विड कोअर स्टेज आणि क्रायोजेनिक अप्पर अप्पर स्टेज असे शक्तीशाली प्रणाली होती. रॉकेटने कोणतीही अडचण न येता व्यवस्थित उड्डाण केले.

ISRO LVM3-M6
ISRO Scientist Eknath Chitnis: ‘इस्रो’चे शिल्पकार डॉ. एकनाथ चिटणीस यांचे निधन; अवकाश संशोधनातील युगप्रवर्तक व्यक्तिमत्त्व हरपले

ब्लू बर्ड ब्लॉक २ अंतराळात स्थिरावले

उड्डाण केल्यानंतर १५ मिनिटांनी रॉकेट लाँचरपासून ब्लू बर्ड ब्लॉक २ हे यशस्वीरित्या वेगळे झाले. त्यानंतर ते अंतराळात ज्या ठिकाणी त्याला पाठवायचं होतं तितं ते स्थिरावलं. जवळपास ५२० किलोमीटर उंचीवर हा उपग्रह स्थिरावला असून इस्रोने ही मोहीम यशस्वी झाल्याचे जाहीर केले आहे.

ISRO LVM3-M6
space sector : अंतराळ क्षेत्रात दोन लाख रोजगार संधी!

आता डायरेक्ट टू मोबाईल कनेक्टिव्हिटी

LVM3 प्रक्षेपकाद्वारे पृथ्वीवरून अंतराळात नेण्यात आलेला ब्लू बर्ड ब्लॉक २ हा सर्वात जड पेलोड होता. भारतीय लाँचरसाठी ही एक ऐतिहासिक कामगिरी होती. हा उपग्रह हा AST SpaceMobile चा भाग होता. ग्लोबल LEO कॉन्स्टेलेशन चा उद्येश हा डायरेक्ट टू मोबाईल कनेक्टिव्हिटी पुरवणे, तसंच कोणत्याही साध्या स्मार्टफोनला कोणत्याही विशेष हार्डवेअरशिवाय ४ जी आणि ५ जी व्हॉईस कॉल, व्हिडिओ, मेसेजिंग आणि डेटा सर्व्हिस पुरवणं सोपं होणार आहे.

ISRO LVM3-M6
China space mice: जीवशास्त्रातील रहस्ये उलगडणार! अंतराळात गेलेल्या उंदरांनी पृथ्वीवर आणला खास खजिना!

LVM3 चे सहावे मिशन

हे उपग्रह लाँचिंग इस्रोच्या व्यावसायिक आर्म्स, न्यू स्पेस इंडिया मिलिटेड (NSIL) आणि एसटी स्पेस मोबाईल कराराअंतर्गत करण्यात आळे. इस्रोने सांगितले की LVM3 द्वारे उड्डाण केलेली ही सहावी ऑपरेशनल फ्लाईट होती. या लाँचरने यापूर्वी चंद्रयान २, चंद्रयान - ३ आणि अन्क वनवेब सॅटेलाईट लाँच केले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news