ISRO Mission | 'इस्रो' कडून पुढच्या 15 वर्षांचा रोडमॅप तयार

आगामी वर्षात रोबो, २०२६ मध्ये अंतराळ मानवी मोहीम, २०४० मध्ये चंद्रावर
ISRO
ISRO Pudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : येत्या ३ महिन्यांत 'इस्रो'ची (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) गगनयान मोहिमेची (ISRO Mission) पहिली मानवरहित मोहीम लाँच होणार आहे. 'इस्रो'त त्याच्या पूर्वतयारीचीच लगबग सुरू आहे. दुसरीकडे, 'इस्रो'ने पुढील १५ वर्षांत राबवायच्या मोहिमांच्या रोडमॅपवरही शेवटचा हात फिरवून झाला आहे. 'इस्रो'ने त्यासाठी ४० वर्षांचे कॅलेंडरही तयार केले आहे. त्यातून भारतीय अंतराळ मोहिमांबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे.

गगनयान काय ?

मानवरहित मोहिमेनंतर 'इस्रो' गगनयानातून 'व्योममित्र' नावाचा मानवसदृश रोबो पाठवणार आहे. एआयच्या (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मदतीने या 'व्योममित्र' रोबोचे वर्तन अगदी मानवाप्रमाणे असेल.

२०२५ च्या अखेरीस अथवा २०२६ व्या सुरुवातीस तीन दिवसांच्या पृथ्वी परिक्रमेसाठी २ भारतीय अंतराळवीर पाठवण्याची 'इस्रो'ची योजना आहे.

२०२९ पर्यंत ३ मानवी मोहिमा अंतराळात राबवल्या जातील. मोहिमेला प्राप्त यशाच्या आधारावर अंतराळ फेण्या व वीरांची संख्याही वाढवली जाईल.

सहा उपग्रह पाठवणार

  • पुढच्याच वर्षी म्हणजे २०२५ मध्ये 'इस्रो' ६ उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.

  • नौदलासाठी जीसॅट-७ आर, लष्करासाठी जीसॅट-७ बी, ब्रॉडबैंड

    आणि इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी जीसॅट-एन २.

  • सुरक्षा दले, निमलष्करी 3 दले. रेल्वेसाठी जीसॅट- एन ३, गगनयानासोबत कनेक्टिव्हिटीसाठी २ उपग्रहही लाँच केले

    जातील.

गगनयान काय ?

गगनयान या ३ दिवसांच्या मोहिमेत अंतराळवीरांना पृथ्वीच्या ४०० कि. मी. वरील कक्षेत पाठवले जाईल आणि नंतर सुरक्षितरीत्या समुद्रात उतरवले जाईल. यात यशस्वी ठरल्यास अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारत असा चौथा देश ठरेल.

इस्रो'चे कॅलेंडर

2025 - मनुष्य चंद्राच्या कक्षेत फिरून पृथ्वीवर परत येणार.

2027 - चांद्रयान-४ मिशन लाँच करणार, चंद्रावरून नमुने आणणार.

2028 - भारतीय अंतराळ स्थानकाचे मॉडेल-१ अंतराळात पाठवणार, स्वदेशी यान जोडणी प्रयोगही अंतराळात पार पडेल. अंतराळातच २ याने परस्परांना जोडली जातील.

2031 - चंद्रावर मानवी मोहीम.

2035 - अंतराळात भारताचे स्थानक उभारणार

2037 - भारतीय रोबो चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार. शुक्रावर यान पाठवणार.

2040 - चंद्रावर भारतीय पाऊल उमटवण्याची योजना.

नौदल, लष्कर, ब्रॉडबैंड, इन- फ्लाईट कनेक्टिव्हिटी, सुरक्षा दले, निमलष्करी दले. रेल्वेसाठी उपग्रह होणार लाँच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news