

पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ हंपी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही अज्ञात लोकांनी एका परदेशी पर्यटकासह दोन महिलांवर सामुहिक बलात्कार केला. तसेच त्यांच्यासोबत असलेल्या तीन पुरुषांना मारहाण करून कालव्यात फेकून दिले. शनिवारी (दि.8) सकाळी यापैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला. याबाबतचे वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री ११:०० ते ११:३० च्या दरम्यान सानापूर तलावाजवळ घडली. संशयितांनी २७ वर्षीय इस्रायली महिला पर्यटक आणि एका २९ वर्षीय होमस्टे ऑपरेटरवर महिलेवर बलात्कार केला.
घटनेच्या वेळी पीडित महिलांसोबत असलेला ओडिशाचा एक पुरुष पर्यटक बेपत्ता झाला होता. हल्लेखोरांनी त्याला तुंगभद्रा कालव्यात फेकून दिले होते. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आळा. त्याचवेळी झालेल्या मारहाणीत अमेरिका आणि महाराष्ट्रातील आणखी दोन पर्यटक जखमी झाले आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी एक विशेष पोलिस पथक तयार करण्यात आले आहे. या घटनेनंतर गंगावती ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, सानापूर तलावाजवळ चार पर्यटक आणि एक होमस्टे ऑपरेटर फिरायला गेले होते. त्यानंतर मोटारसायकलवरून तीनजण तिथे आले, त्यांनी त्यांच्याजवळ पेट्रोल पंपाबद्दल विचारपूस सुरू केली. जेव्हा होमस्टे ऑपरेटरने जवळपास पेट्रोल पंप नसल्याचे सांगितले तेव्हा त्यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली. पर्यटकांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर, कन्नड आणि तेलुगू भाषा बोलणाऱ्या आरोपींनी त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी तीन पुरुष पर्यटकांना जबरदस्तीने कालव्यात ढकलले.
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिच्या मैत्रिणी कालव्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना, तीनपैकी दोघांनी तिच्यावर आणि इस्रायली महिलेवर बलात्कार केला. घटनेपासून, एक विशेष पोलिस पथक आरोपींचा शोध घेत आहे. शुक्रवारी सकाळपासून श्वान पथक आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी बेपत्ता पर्यटकाचा शोध घेतला. शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला. पोलीस आता आरोपींची ओळख पटवून त्यांना लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.