Israel military apology : चुकीचा नकाशा केला पोस्‍ट, इस्‍त्रायलने भारताची मागितली माफी

सोशल मीडियावर भारतीयांच्‍या तीव्र नाराजीनंतर दिली चुकीची कबुली
Israeli Military Apologises Over missile range map
इराणवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर इस्‍त्रायलने इराणला जागतिक धोका म्हणून दाखवण्याच्या उद्देशाने हा नकाशा पोस्‍ट केला होता. (Image source- X)
Published on
Updated on

Israeli Military Apologises Over missile range map : भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांचा चुकीचा नकाशा पोस्ट केल्याबद्दल इस्रायलच्‍या लष्‍कराने माफी मागितली आहे. ही पोस्‍ट इस्रायलने इराणवर केलेल्‍या हवाई हल्‍ल्‍यानंतर केली होती. हा नकाशा केवळ प्रदेशाचे दृश्यात्मक प्रतिनिधित्व म्हणून वापरण्यात आला होता, असा खुलासाही इस्‍त्रायलने केला आहे.

इराणला 'जागतिक धोका' दाखवण्याच्या उद्देशाने नकाशा केला पोस्‍ट

इराणवर केलेल्‍या हल्‍ल्‍यानंतर इस्‍त्रायलने इराणला जागतिक धोका म्हणून दाखवण्याच्या उद्देशाने हा नकाशा पोस्‍ट केला होता. या नकाशात नकाशात जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानचा भाग असल्याचे दाखवण्यात आले. या नकाशात इराणपासून बाहेर येणाऱ्या लाल वर्तुळांचा वापर करत इराणच्या क्षेपणास्त्रांच्या क्षमतेची व्याप्ती दाखवली होती. या वर्तुळांनी सौदी अरेबिया, लिबिया, इथिओपिया, भारत, चीन, रोमानिया, बल्गेरिया, रशिया, कझाकस्तान आणि तुर्की यांना व्यापले होते. या पोस्‍टनंतर अनेक भारतीय युर्जसंनी तीव्र संताप व्यक्त करत ही चूक निदर्शनास आणून दिली. एका तक्रारदाराने म्हटले की, आता तुम्हाला समजले असेल की भारत तटस्थ का राहतो. आंतरराष्‍ट्रीय राजकारणा कोणीही तुमचा मित्र नसतो. काहींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनाही टॅग केले. त्यांनी ही चूक इस्रायलच्या निदर्शनास आणून दिली आणि इस्रायली सैन्याला पोस्ट मागे घेण्यास सांगितले.

आम्ही दिलगिरी व्यक्त करतो...

इंडियन राईट विंग कम्युनिटी नावाच्या 'एक्स' हँडलने केलेल्या अशाच ट्विटला उत्तर देताना इस्रायलच्‍या संरक्षण दलांनी म्हटले आहे की, आम्‍ही अचूक नकाशा देण्‍यात चुकलो, असे स्‍पष्‍ट करत इस्‍त्रालयने मूळ पोस्टनंतर सुमारे ९० मिनिटांनी ही माफी मागितली. तसच हा नकाशा सीमांची अचूक रचना दर्शवत नाही. तो केवळ प्रदेशाचे दृश्यात्मक प्रतिनिधित्व म्हणून वापरण्यात आला होता, असा खुलासाही केला.

केंद्र सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया नाही

पाकव्‍याप्‍त काश्‍मीर हा भारताचा अविभाज्‍य भाग आहेत, असे भारताने अनेकवेळा स्‍पष्‍ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर राबविण्‍यात आलेल्‍या ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा व्यक्त केली होती. आता इस्‍त्रायलने पोस्‍ट केलेल्‍या नकाशाबाबत केंद्र सरकारने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पंतप्रधान मोदींनी २०१७ मध्‍ये दिली होती इस्रायलला भेट

२०१७ मध्ये पंतप्रधान मोदी हे इस्रायेलला भेट देणारे पहिले भारतीय नेते ठरले होते. भारत आणि इस्‍त्रायल यांच्‍यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ झाले होते. भारत हा इस्रायेलकडून लष्करी उपकरणे खरेदी करणार्‍या प्रमुख दैशांपैकी एक आहे. त्यामुळे भारताच्या सीमांचा चुकीचा नकाशा पोस्ट होणे अनेकांसाठी धक्कादायक ठरले आहे. दरम्‍यान, इस्‍त्रायल आणि इराण यांच्‍यातील संघर्षाचा पुन्‍हा एकदा भडका उडाला आहे. इस्‍त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्‍याहू आणि इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी एकमेकांना धमक्‍या देत आहेत. खोमेनी यांनी इस्रायलवर युद्ध सुरू करण्याचा आरोप केला आहे तर यापुढेही हल्‍ले सुरु राहतील, अशा इशारा नेतान्‍याहू यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news