ISI Sleeper Cell | आयएसआयकडून ‘लेडी ब्रिगेड स्लीपर सेल’

धर्मांतर करून मुलींचा दहशतवादी कारवायांसाठी वापर : तपास यंत्रणांची माहिती
ISI-lady-brigade-sleeper-cell-revealed-in-india
ISI Sleeper Cell | आयएसआयकडून ‘लेडी ब्रिगेड स्लीपर सेल’Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेकडून भारतात ‘लेडी ब्रिगेड स्लीपर सेल’चे कारस्थान सुरू असल्याचे उघड झाले आहे. धर्मांतर करवून मुलींचा वापर दहशतवादी कारवायांसाठी केला जात असल्याची धक्कादायक माहिती तपासातून पुढे आली आहे.

आग्रा येथील धर्मांतर प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने केलेल्या तपासात धक्कादायक माहिती उघड केली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय धर्मांतराच्या नावाखाली भारतात ‘लेडी ब्रिगेड’ नावाचे स्लीपर सेल तयार करत होती. पाकिस्तानी यूट्यूबर तनवीर अहमद आणि साहिल अदीब हे मुलींना कट्टरपंथी बनवण्याचे काम करत होते. उत्तर प्रदेशातील आग्रा येथील धर्मांतराशी संबंधित एका खळबळजनक प्रकरणाने देशाच्या गुप्तचर यंत्रणांना हादरवून सोडले आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्मांतराच्या बहाण्याने पीडित मुलींना कट्टरतेच्या मार्गावर ढकलले जात होते. या कटामागे पाकिस्तानचे दोन यूट्यूबर तनवीर अहमद आणि साहिल अदीब यांचा हात असल्याचे समोर आले आहे, जे ऑनलाईन माध्यमातून मुलींना इस्लाम धर्माचे कट्टर प्रशिक्षण देत होते. हे दोघेही थेट आयएसआयसाठी काम करत असल्याचे उघड झाले आहे.

फिलिपाईन्स येथून होत होता निधी पुरवठा

फिलिपाईन्समध्ये असलेली एक एनजीओ या ऑनलाईन क्राऊडफंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे धर्मांतर सिंडिकेटला सातत्याने पैसे पाठवत होती. या निधी पुरवठ्यासाठी क्रिप्टोकरन्सी आणि अमेरिकन डॉलरचा वापर केला जात होता, जेणेकरून पैशांचा माग लागू नये, अशी माहिती उघड झाली आहे. सूत्रांनुसार, कॅनडामध्ये राहणारा सय्यद दाऊद या सिंडिकेटला आर्थिक मदत करत होता. दाऊद मूळचा मध्य प्रदेशातील गांधीनगरचा रहिवासी आहे. तो कॅनडामध्ये एक इस्लामिक सेंटरही चालवतो, जे संशयास्पद कारवायांमध्ये सामील असल्याचे म्हटले जाते. याशिवाय इंग्लंडमधूनही ‘व्हाईट डोनेशन’च्या नावाखाली या सिंडिकेटला निधी पाठवला जात होता.

पीडित मुलींना केवळ धर्म परिवर्तनासाठीच प्रवृत्त केले जात नव्हते, तर त्यांना जिहाद आणि कट्टर विचारसरणीकडे वळवले जात होते. सूत्रांनी सांगितले की, या टोळीचा इरादा मुलींना आखाती देशांमध्ये पाठवण्याचाही होता. तिथे त्यांचा वापर एखाद्या मोठ्या कटाचा भाग म्हणून केला जाऊ शकला असता. तपासात असेही आढळून आले की, या सिंडिकेटची व्हॉटस्अप विंग दिल्लीत सक्रिय होती, जिथे धर्मांतरासाठी प्रचार व प्रसार केला जात होता. याशिवाय काश्मीरमधील मास्टरमाईंड हारिस याची ओळख पटली असून, त्याचा शोध आता वेगाने सुरू करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात दहशतवादी कटाचे धागेदोरे मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश एटीएससोबतच केंद्रीय तपास यंत्रणाही सक्रिय झाल्या आहेत. तपास यंत्रणांचे मत आहे की, या धर्मांतर नेटवर्कद्वारे आयएसआयला भारतात केवळ सांस्कृतिक आणि धार्मिक अस्थिरता पसरवायची नव्हती, तर दीर्घकाळासाठी एक महिला स्लीपर सेल उभा करण्याची योजना होती.

कॅनडा, इंग्लंड आणि आखाती देशांशी कनेक्शन

उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली आहे की, धर्मांतराच्या नावाखाली पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतात ‘लेडी ब्रिगेड’ नावाचे स्लीपर सेल तयार करत होती. या सिंडिकेटचे जाळे केवळ भारतातच नव्हे, तर कॅनडा, इंग्लंड, फिलिपाईन्स आणि आखाती देशांपर्यंत पसरले होते.

संशयितांना अटक

सध्या या कटातील अनेक संशयितांना अटक करण्यात आली असून, अनेकांवर नजर ठेवली जात आहे. तपास यंत्रणांच्या मते, हे आता केवळ धर्मांतराचे प्रकरण राहिलेले नाही; तर हा एक बहुस्तरीय आंतरराष्ट्रीय कट आहे, ज्यामध्ये दहशतवादी नेटवर्क, डिजिटल फंडिंग आणि कट्टरतेचे धोकादायक मिश्रण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news