Vande Bharat Sleeper Food Menu : 'वंदे भारत'मधील जेवणाच्या मेनूमध्ये IRCTC ने केली मोठी कपात; कारण काय?

Vande Bharat Sleeper Food Menu : स्लीपरच्या प्रवाशांसाठी ३ मार्गांवर प्रायोगिक प्रकल्प लागू
Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari News.
Published on: 
Updated on: 

Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC : रेल्वेमधील अन्नाच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारींची दखल घेत, इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या मेनूमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून, तीन वंदे भारत स्लीपर मार्गांवर मर्यादित मेनू लागू करण्यात आला आहे. , पर्यायांची संख्या कमी केल्यामुळे अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छता राखणे अधिक सोपे होईल, असा विश्‍वास 'आयआरसीटीसी'ने व्‍यक्‍त केला आहे.

तीन प्रमुख मार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी

IRCTC ने १ नोव्हेंबर २०२६ पासून तीन वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये एक संक्षिप्त मेनू सुरू करण्याचा प्रायोगिक प्रकल्प हाती घेतला आहे. प्रवाशांकडून अन्नाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत आलेल्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या ही व्यवस्था मुंबई-बेंगळुरू, हावडा-कामाख्या (गुवाहाटी) आणि नवी दिल्ली-वाराणसी जंक्शन अशा तीन मार्गांवर लागू करण्यात आली आहे. IRCTC या ट्रेनमधील प्रवाशांच्या प्रतिसादाचे मूल्यांकन करेल आणि त्यानंतर इतर मार्गांवरही असाच संक्षिप्त मेनू लागू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC
Borivali Virar Railway Project: बोरीवली-विरार पाचव्या-सहाव्या रेल्वे मार्गिकांना गती; दहिसर-मिरा रोडदरम्यान जमीन मजबूत करण्याचे काम सुरू

वंदे भारत ट्रेनमधील मर्यादित मेनू

आता प्रवाशांना नाश्त्यासाठी इडली-वडा, पोहे किंवा उपमा यांपैकी निवड करता येईल. इडली आणि वड्यासोबत सांबार आणि चटणी दिली जाईल.यापूर्वी नाश्त्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध होते, आता ते काढून टाकण्यात आले आहेत. यामध्ये सूप, एग ऑम्लेट, ऑम्लेट सँडविच, व्हेज सँडविच, ताक आणि चॉकलेट यांचा समावेश होता.

Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC
Indian Railways Night Charging Rule : ट्रेनमध्ये रात्री मोबाईल चार्जिंग राहणार बंद; जाणून घ्या मुख्य कारण

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मेनूमध्येही कपात

दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाच्या मेनूमध्येही कपात करण्यात आली आहे. आता प्रवाशांना चपाती, भात, डाळ आणि मुख्य पदार्थ (भाजी किंवा मांसाहारी पदार्थ) दिले जातील. मुख्य पदार्थांमध्ये प्रवाशांना चिकन (मांसाहारी) किंवा शाकाहारी पर्यायांपैकी निवड करता येईल. नवीन मेनूमधून सुकी भाजी, दही, सॅलड, लोणचे आणि मिठाई काढून टाकण्यात आली आहे.

Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC
Vande Bharat Brake Failure: ब्रेक निकामी असतानाही ४६३ किमी धावली वंदे भारत; लोको पायलटच्या इशाऱ्याकडे रेल्वे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

IRCTC ने जेवणाचे प्रमाणही केले कमी

IRCTC ने केवळ जेवणाचे पर्यायच नव्हे, तर जेवणाचे वजनही कमी केले आहे. पूर्वी एका जेवणाचे वजन सुमारे ७०० ते ७५० ग्रॅम असायचे, आता ते कमी करून सुमारे ४५० ते ५०० ग्रॅम करण्यात आले आहे. आता प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत सुमारे २०० ग्रॅम कमी अन्न मिळणार आहे. IRCTC ने वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या या तीन मार्गांवर जेवण तयार करण्यासाठी आणि पुरवण्यासाठी तीन हॉस्पिटॅलिटी व खाद्यसेवा कंपन्यांशी भागीदारी केली आहे.

Vande Bharat Sleeper Food Menu Cut IRCTC
Bengaluru-Madgaon Vande Bharat Express | 'वंदे भारत'मुळे आंतरराज्यीय व्यापाराला मिळेल चालना

प्रवासी 'जेवण नको' हा पर्याय निवडू शकतात

वंदे भारत स्लीपर ट्रेनमधील केटरिंगचे शुल्क तिकीट दरामध्येच समाविष्ट आहे, मात्र तिकीट बुक करताना प्रवासी 'जेवण नको' (no-food) हा पर्याय निवडू शकतात. मेनूमध्ये पदार्थांची संख्या कमी असल्याने आणि जेवणही हलके असल्याने, आता केटरिंग शुल्कात कपात केली जाईल का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.