New RAW chief : नवीन ‘रॉ’ प्रमुख पराग जैन कोण आहेत? जाणून घ्‍या ऑपरेशन सिंदूरमध्‍ये महत्त्‍वाची भूमिका बजावेल्‍या अधिकार्‍याविषयी

पाकिस्‍तानविषयी सखोल अभ्‍यास, १ जुलै रोजी दोन वर्षांसाठी स्‍वीकारणार 'रॉ'चे प्रमुखपद
New RAW chief Parag Jain
नवीन ‘रॉ’ प्रमुख पराग जैन.File Photo
Published on
Updated on

New RAW chief Parag Jain

पाकिस्‍तानचे कंबरडे मोडणार्‍या 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावले आयपीएस अधिकारी पराग जैन यांची देशाची गुप्तचर संस्था 'रॉ'च्‍या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान रॉ प्रमुख रवी सिन्हा यांच्या कार्यकाळ ३० जून रोजी पूर्ण होत आहे. पराग जैन १ जुलै रोजी पुढील दोन वर्षांसाठी 'रॉ' प्रमुखपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

कोण आहेत पराग जैन?

पराग जैन हे १९८९ च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्‍या ते एव्हिएशन रिसर्च सेंटरचे (Aviation Research Centre) प्रमुख आहेत. या केंद्रानेच नुकतेच राबवलेल्‍या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्‍ये पाकिस्तानी सशस्त्र दल आणि दहशतवादी छावण्यांच्या ठिकाणांविषयी महत्त्वाची माहिती गोळा करण्‍यात मोलाची भूमिका बजावली होती.

पंजाबमधील दहशतवादी काळात जैन यांनी बजावली महत्त्‍वाची भूमिका

९० च्‍या दशकात पंजाबमध्‍ये दहशतवादाने थैमान घातले होते. या काळात जैन यांनी भटिंडा, मानसा, होशियारपूर येथे कार्यरत राहून महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी चंदीगडचे एसएसपी (SSP) आणि लुधियानाचे डीआयजी (DIG) म्हणूनही काम पाहिले आहे.

New RAW chief Parag Jain
RAW : एक गुप्तहेर जे RAW चे पहिले संचालक आणि जगात टॉप ५ मध्ये होता त्यांचा डंका!

एक शांत आणि संयमी अधिकारी...पाकिस्‍तानविषयी सखोल अभ्‍यास

भारताच्या बाह्य गुप्तचर संस्थेत त्यांनी पाकिस्तानशी संबंधित जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. जम्‍मू-काश्‍मीरला विशेष दर्जा बहाल करणारे लम ३७० रद्द करताना आणि ‘ऑपरेशन बालाकोट’ दरम्यान ते जम्मू आणि काश्मीरमध्ये कार्यरत होते. एक शांत आणि संयमी अधिकारी म्हणून ओळखले जाणारे पराग जैन यांनी कॅनडा आणि श्रीलंकेत भारताचे प्रतिनिधी म्हणूनही सेवा बजावली आहे. कॅनडातील कार्यकाळात त्यांनी खलिस्तानी नेटवर्कला आव्हान दिले होते. तसेच हे नेटवर्क अधिक धोकादायक बनत असल्याचा इशारा त्यांनी केंद्र सरकारला वारंवार दिला होता.

New RAW chief Parag Jain
Raw Operations In Pakistan : पाकिस्तानात ‘रॉ’चे ऑपरेशन जोमात; पाक लष्कर कोमात!

जैन यांच्‍या समोरील आव्‍हाने

पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी द्वेषपूर्ण भाषणे करून काश्मीरला पाकिस्तानची ‘जीवनवाहिनी’ म्हटले. यानंतर २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्‍ला झाला. आता असीम मुनीर यांना फील्ड मार्शल पदावर बढती मिळाल्याने आणि भारताविरुद्ध सीमापार दहशतवाद त्यांच्या अजेंड्यावर अग्रस्थानी असल्याने ‘रॉ’ची भूमिका अत्यंत महत्त्वाची बनली आहे. भारताने सिंधू पाणी वाटप करार स्थगित केला आहे. त्यामुळे पाकिस्तान प्रत्युत्तर म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची शक्यता आहे. अशा आव्‍हानात्‍मक काळात रॉचे प्रमुखपद पराग जैन यांच्‍याकडे आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news