Legislative Council Elections | विधान परिषदेच्या देशभरातील २३ जागांसाठी चुरशीने मतदान

यूपीतील ११, बिहारमधील ८, तर कर्नाटकातील ४ जागा
Legislative Council Elections |
Legislative Council Elections | विधान परिषदेच्या देशभरातील २३ जागांसाठी चुरशीने मतदान -
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्रात विधान परिषदेच्या काही पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी मोठ्या चुरशीने मतदान प्रक्रिया पार पडत असतानाच शुक्रवारी देशातील इतर काही राज्यांमध्येदेखील विधान परिषदेच्या काही जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. यात बिहार, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांतील विधान परिषदेच्या जागांचा समावेश होता.

या निवडणुकीत सर्वाधिक ११ जागा उत्तर प्रदेशातील आहेत. बिहारमध्ये आठ, तर कर्नाटकमध्ये चार जागांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणीदेखील २७ ऑक्टोबर रोजीच होणार आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील ११ पैकी पाच मतदासंघ पदवीधर आणि सहा शिक्षक मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या प्रत्येकी चार जागा आहेत, तर कर्नाटकमध्ये दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या जागांसाठी मतदान झाले.

विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह आहे. पदवीधर मतदारसंघातून मतदान करण्यासाठी किमान तीन वर्षांपूर्वी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक असते, तर शिक्षक मतदारसंघासाठी माध्यमिक किंवा त्यापुढील स्तरावर किमान तीन वर्षे अध्यापनाचा अनुभव आवश्यक असतो. विधान परिषद हे स्थायी सभागृह असून यातील सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो. दर दोन वर्षांनी एकतृतीयांश सदस्य निवृत्त होत असल्याने अशा निवडणुका होत असतात. आता २७ ऑक्टोबरच्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंत्र्यांसमोरच कार्यकर्त्यांचा राडा

उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे मतदानादरम्यान समाजवादी पक्ष आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. राज्यमंत्री कपिलदेव अग्रवाल यांच्यासमोरच दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून पोलिसांनी मध्यस्थी केली आणि दोन्ही गटांना शांत केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news