India's first glacier lake warning system|देशातील पहिली 'ग्लेशियर लेक' पूर्वसूचना प्रणाली कार्यान्वित

हिमाचल प्रदेशातील घेपन घाट तलावावर यंत्रणा सज्ज
India's first glacier lake warning system
India's first glacier lake warning system
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

हिमालयातील संवेदनशील भागात संभाव्य जलप्रलयाचा धोका वेळीच ओळखण्यासाठी देशातील पहिली 'ग्लेशिअल लेक आऊटबर्स्ट फ्लड' पूर्वसूचना प्रणाली हिमाचल प्रदेशात बसवण्यात आली आहे. लाहौल आणि स्पीती जिल्ह्यातील समुद्रसपाटीपासून सुमारे ४,१०० मीटर उंचीवर असलेल्या 'घेपन घाट' हिमनदी तलावावर ही अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आली आहे.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निधीतून आणि 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग' (सी-डॅक) ने विकसित केलेल्या या प्रणालीद्वारे तलावातील पाण्याची पातळी आणि हवामानातील बदलांवर २४ तास लक्ष ठेवले जाईल. या प्रणालीत तरंगणारे मॉनिटरिंग स्टेशन, स्वयंचलित हवामान केंद्र आणि ग्लेशियर व्हिजन युनिटचा समावेश आहे. हा सर्व डेटा सी-डॅकच्या सुपरकंप्युटरशी जोडला गेला असून, संभाव्य धोक्याची पूर्वसूचना प्रशासनाला तातडीने मिळणार आहे.

५ मिनिटांत मानवी वस्तीत पोहोचू शकते पाणी

लाहौल-स्पीतीच्या जिल्हाधिकारी किरण भडाना यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तलावाचा बांध फुटल्यास अवघ्या पाच मिनिटांत हे पाणी खालच्या भागातील गावांमध्ये पोहोचू शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

नदीपात्रात पूररेषा निश्चित; स्थानिक यंत्रणा सतर्क

सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने चंद्रा-चिनाब (चंद्रभागा) नदी खोऱ्यात 'हाय फ्लड लेव्हल' खुणा पूर्ण केल्या आहेत. संभाव्य धोकादायक गावे ओळखून स्थानिक पातळीवर जलद प्रतिसाद पथके सज्ज करण्यात येत आहेत. ही प्रणाली हिमालयीन परिसंस्थेचे रक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी एक मैलाचा दगड ठरेल.

India's first glacier lake warning system
Kota Student Fight : कोटामध्ये NEET च्या दोन विद्यार्थ्यांमध्ये राडा; खेळण्यातील बंदुकीने डोक्यावर वार, एक जखमी

तलावाचा आकार १७८ टक्क्यांनी वाढल्याने चिंता

१९८९ ते २०२२ दरम्यान या तलावाचा विस्तार ३६.५ हेक्टरवरून थेट १०१.३ हेक्टरपर्यंत (१७८% वाढ) पोहोचला आहे. सध्या या तलावाची लांबी २,४६४ मीटर आणि रुंदी ६२५ मीटर असून, त्यात तब्बल ३.५ कोटी घनमीटरहून अधिक पाणी साठले आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये इस्रोने या वाढत्या आकाराबाबत धोक्याचा इशारा दिला होता.

India's first glacier lake warning system
AI Agents Cybersecurity Threat: AI एजंट्सचा नवा धोका! भारतीय कंपन्यांचा गोपनीय डेटा उघड; CERT-In चा गंभीर इशारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news