

Indian Railways Ticket Rules
नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्याची सुरुवात होताच ख्रिसमस आणि नववर्षाच्या पर्यटनाचे फ्लॅनिंग सुरु होते. अशावेळी प्रवासाच्या आनंदाबरोबरच खिशालाही परवडणारा म्हणून बहुतांश जण रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. आता यावर्षीही पालकांनी आपल्या मुलांसह पर्यटनाचा बेत आखला असेलच. आता भारतीय रेल्वे येत्या ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सुट्ट्यांसाठी तिकीट बुकिंग सुरू करत आहे. अशावेळी पालकांना भारतीय रेल्वेच्या मुलांच्या तिकीटच्या नियमांची माहिती असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया रेल्वे तिकिट नियमांविषयी...
रेल्वे मंत्रालयाने ६ मार्च २०२० रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल्वे तिकिट नियमानुसार ५ वर्षांच्या आतील मुलांचा प्रवास हा पूर्णपणे मोफत आहे. याचा अर्थ पाच वर्षाच्या आतील मुलांसाठी वेगळा बर्थ बुक करण्याची आवश्यकता नाही. मात्र त्याना तसेच त्यांना स्वतंत्र बर्थ दिला जात नाही. मुलाला पालकांसोबत एकाच बर्थवर प्रवास करावा लागतो.
पालकांना ५ वर्षांखालील मुलांसाठीही स्वतंत्र बर्थ हवा असेल, तर त्यांना प्रौढांइतके भाडे भरून तिकीट काढावे लागते. हा पर्याय पूर्णपणे ऐच्छिक असतो.
५ ते १२ वर्षांखालील मुलांसाठी आरक्षित सीट नको असेल तर तुम्ही अर्धे तिकीट खरेदी करू शकता. मात्र त्यांना बसायला वेगळी सीट मिळत नहा. जर स्वतंत्र बर्थ हवा असेल तर संपूर्ण पूर्ण तिकिटाचे भाडे आकारले जाते.
१२ वर्षे आणि पूर्ण प्रौढांसाठी पूर्ण तिकीटाचे भाडे आकारले जाते.