

Ravi Tamta Flying car : सध्या इलॉन मस्कच्या टेस्ला रोडस्टरच्या हवेत उडणाऱ्या कारची जगभरात चर्चा आहे. रॉकेट लाँचरचे प्रॉपेलर बसवून मस्क यांनी ही कार बनवली आहे. ही कार प्रत्यक्षात येण्यासाठी अजून दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पण तुम्हाला ऐकून आर्श्चय वाटेल की कोणतीही इंजिनीअरींगची पदवी नसताना एका भारतीय तरुणाने अशी हवेत उडणारी कार तयार केली आहे. उत्तरांखंड येथे राहणाऱ्या या तरुणाचे नाव आहे रवी टाम्टा, रवीच्या जिद्द म्हणजे त्याने सलग तेरा वर्षे या कारचे स्वप्न साकार करण्यासाठी माहिती गोळा केली व कार प्रत्यक्षात उतरवली.
कोणतीही औपचारिक विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी नसताना, केवळ इंटरनेटवरील माहिती आणि सातत्यपूर्ण प्रयोगांच्या जोरावर उत्तराखंडमधील अल्मोरा जिल्ह्यातील रवी तामटा या तरुणाने ही इलेक्ट्रिक उडणारी कार (Flying Car) तयार केली आहे. कला शाखेचा (Bachelor of Arts) पदवीधर असलेल्या रवीच्या या प्रवासाने नवसंशोधन आणि शिक्षणाविषयीच्या पारंपारिक संकल्पनांना नव्याने आव्हान दिले आहे.
रवीने विकसित केलेल्या 'HAPIDA SKYNeX' या सिंगल-सीटर (एका आसनी) वाहनाने ऑगस्ट 2026 मध्ये यशस्वी चाचणी उड्डाण पूर्ण केले.
डोंगरातील अडचणींतून संकल्पनेचा जन्म
रवी तामटा याचे बालपण जागेश्वर धामजवळील काफलीखान या खेड्यात गेले. डोंगराळ भागातील बिकट रस्ते, प्रवासाची आव्हाने आणि आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात पोहोचण्यासाठी लागणारा वेळ पाहून त्याच्या मनात वैयक्तिक हवाई वाहतुकीची कल्पना आली.
२०१५ पासून त्याने या स्वप्नावर काम करण्यास सुरुवात केली. पुढे 'हपिदा स्काय प्रायव्हेट लिमिटेड' या उपक्रमांतर्गत त्याने प्रोटोटाइप विकसित केला या वाहनाला उड्डाण आणि उतरण्यासाठी कोणत्याही धावपट्टीची (Runway) गरज नाही; हे ड्रोन तंत्रज्ञानावर थेट जमिनीवरून वर उडू शकते.
इलेक्ट्रिक मोटर्स व प्रोपेलर्स:
हे वाहन मल्टिरोटर ड्रोन तंत्रज्ञानावर चालते. यात हलकी फ्रेम, कॉकपिट आणि पारदर्शक कॅनोपी आहे. हे वाहन पूर्णपणे बॅटरीवर चालत असल्याने त्याला विमान इंधन किंवा इथेनॉलची गरज भासत नाही.
इंटरनेट पाहून तयार केले प्रोटोटाईप
गावात प्राथमिक शिक्षण आणि नैनिताल येथून बीए पदवी पूर्ण करणाऱ्या रवीचे वडील हरिश राम हे मेकॅनिक आहेत. कोणतीही अत्याधुनिक प्रयोगशाळा किंवा अभियांत्रिकी प्रशिक्षण उपलब्ध नसताना, रवीने १३ वर्षे इंटरनेटवरील माहिती, ट्यूटोरिअल्स आणि स्वतः केलेल्या प्रयोगांमधून तांत्रिक ज्ञान मिळवले. उडणाऱ्या वाहनासाठी आवश्यक असणारे डिझाइन, बॅटरी क्षमता, सुरक्षितता आणि स्थिरता यांसारख्या आव्हानांवर मात करण्यासाठी त्याने कठोर परिश्रम घेतले.
हे उड्डाण एक महत्त्वाची प्राथमिक पायरी असली तरी, व्यावसायिक किंवा प्रवासी वापरासाठी या वाहनाला सुरक्षा मानके आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची (DGCA) अधिकृत मंजुरी मिळणे आवश्यक आहे. दुर्गम भाग आणि वैद्यकीय आणीबाणीत जलद मदतीसाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते.