मोहम्मद सिराज बनला DSP, तेलंगणात पदभार स्वीकारला

Mohammed Siraj : सिराजला तेलंगणा सरकारने दिली नोकरी
Mohammed Siraj
मोहम्मद सिराज याने शनिवारी तेलंगणात डीएसपी पदाचा म्हणून पदभार स्वीकारला.(image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Indian Fast bowler Mohammed Siraj) तेलंगणात (Telangana) पोलीस उपअधीक्षक (DSP) बनला आहे. त्याने शनिवारी अधिकृतपणे डीएसपी पदाचा म्हणून पदभार स्वीकारला. सिराजने तेलंगणाचे पोलिस महासंचालक (डीजीपी) जितेंद्र आणि इतर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी जुलैमध्ये सिराजला निवासी भूखंड आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती. भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर सिराजने मुख्यमंत्री रेड्डी यांची भेट घेतली होती. त्यावेळी रेवंत रेड्डी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सिराजचे अभिनंदन केले होते.

सिराजकडे श्रेणी-१ च्या नोकरीसाठी शैक्षणिक पात्र नव्हता. पण राज्य मंत्रिमंडळाने त्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून त्याला सूट दिली. "श्रेणी-१ च्या नोकरीसाठी पदवीपर्यंतचे शिक्षण आवश्यक आहे. सिराज इंटरमिजिएट (12 वी) उत्तीर्ण आहे. पण आम्ही त्याला श्रेणी-१ ची नोकरी देण्यासाठी शैक्षणिक पात्रतेत सूट दिली आहे," असे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले होते.

मोहम्मद सिराजची कारकीर्द

मोहम्मद सिराजने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये २७.५७ च्या सरासरीने १६३ विकेट घेतल्या आहेत. त्याने ४ नोव्हेंबर २०१७ रोजी राजकोट येथील न्यूझीलंड विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामान्यात पदार्पण केले होते.

Mohammed Siraj
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून रोहित शर्मा बाहेर पडणार? हिटमॅनने BCCला सांगितले...

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news