

Khan Sir Wife A S Khan Photo
नवी दिल्ली : पटना येथील प्रसिद्ध कोचिंग शिक्षक खान सर हे लग्नबंधनात अडकले आहेत. २ जून रोजी त्यांनी पटना येथील एका आलिशान हॉटेलमध्ये आपल्या लग्नाची पार्टी आयोजित केली होती. त्यांची पत्नी ए. एस खान ही बिहारमधील सिवान येथील राहणारी आहे. या पार्टीमध्ये राजकारणी, फिल्मशी संबधीत, लोक शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे लोक सहभागी झाले होते. जवळपास ५००० लोकांना या पार्टीमध्ये आमंत्रण दिल्याची माहिती कळत आहे.
शिकवण्याच्या आपल्या अनोख्या अंदाजामुळे देशभरात चर्चित असेलेले खान सर पटना येथे कोचिंग घेतात. १५ दिवसांपूर्वी त्यांच्या घरच्या लोकांच्या उपस्थितीती हा विवाह सोहळा पार पडल्याची माहीती पूढे येत आहे त्यांच्या विवाहाला केवळ जवळचे १५ लोकच हजर होते. त्यामुळे त्यांनी सर्व मित्रमंडळीसाठी या रिसेस्पशन पार्टीचे आयोजन केले होते.
खान सर यांच्या पत्नीविषयी सांगायचे तर त्यांच्या घरच्या लोकांनी त्यांच्यासाठी पत्नीची निवड केली. ए एस खान ही सिवान येथील राहणारी असून विषेश म्हणजे खान सर यांच्या नानीचे घरही सिवान येथे आहे. तसेच त्यांची पत्नी ही त्यांच्या नातेवाईकांमधील असल्याचीही माहीती समोर येत आहे. सीवान मधील झिगरवाह येथे त्यांचे घर असून त्यांची पत्नी ही उच्च शिक्षीत असून ICSE बोर्डातून त्यांनी शिक्षण पूर्ण केले असून उच्च शिक्षणही पूर्ण केल्याची माहीती आहे.
खान सर यांच्या आईन त्यांच्यसासाठी ए. एस खान हिची निवड केली. तर त्यांच्या छोट्या भावाने खान सर यांना लग्नासाठी राजी केल्याची माहीती पुढे आली आहे. खान सर यांनी आपल्या क्लासमध्ये या गोष्टीचा खूलासाही केला होता. यामुळे त्यांनी घरच्या लोकांच्या पसंतीने लग्न केल्याचे समोर येत आहे.
‘खान सर’ या नावानेच प्रचलित असलेल्या खान सर यांच्या नावावरुन बरेच विवाद आहेत. पण त्यांचे खरे नाव फैसल खान असल्याचे काही मिडीया रिपोर्ट आहेत. पण त्यांनीही आपल्या नावावरुन सुरवातीला पडदा हटवलेला नव्हता पण नंतर त्यांनी आपले नाव फैसल खान असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या जन्म १९९३ साली गोरखपूर उत्तर प्रदेश यथील आहे. खान सर हे पटना येथे कोचिंग क्लास चालवतात आपल्या शिकवण्याच्या अनोख्या अंदाजामुळे ते प्रसिद्ध आहेत.
खान सर यांची महिन्याची अंदाजे कमाई १५ लाख असल्याची माहिती आहे. भारतातील सर्वात प्रसिद्ध शिक्षकांपैकी ते एक आहेत. ‘खान जीएस रिसर्च सेंटर’ या त्यांच्या स्पर्धा परीक्षा कोचिंग क्लासची फी अगदी सर्व सामान्य विद्यार्थ्यांना परवडणारी आहे. त्यामुळे कोचिंग क्लासमधून त्यांची एवढी कमाई होत नाही. खरी कमाई ही युट्यूबमधून होत असते त्यांचे यूट्यूबवर २.४ कोटी सबस्क्रिप्शन आहेत. त्यामुळे ऑनलाईन कमाईच त्यांची ११ ते १२ लाख इतकी आहे. तसेच इतर शैक्षणिक कामातून ते कमाई करत असतात. अनेक स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम खान सर करत असतात.