

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय तटरक्षक दलाने सोमवारी (दि.25) अंदमान आणि निकोबार बेटांजवळ बंगालच्या उपसागरात पाच टन ड्रग्ज घेऊन जाणारी बोट पकडली आहे. या बोटीचा वापर मासेमारी करण्यात येच होता. मात्र यामधून इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या बद्दल बोलताना तटरक्षक अधिकाऱ्यांच्या म्हणाले, भारतीय तटरक्षक दलाने आतापर्यंत अंमली पदार्थाविरोधात केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. तसेच इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे.