Indian Citizenship | १८८ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल

‘सीएए’वरून काँग्रेसने मुस्लिमांना भडकावले : अमित शहांचा घणाघात
Indian citizenship restored to Pakistani Hindus
१८८ पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहालfile photo
Published on
Updated on

अहमदाबाद : देशात नागरिकत्व कायदा (सीएए) लागू झाल्यानंतर अनेकांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. याअंतर्गत रविवारी येथे आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 188 पाकिस्तानी हिंदूंना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.

सीएएवरून काँग्रेस आणि मित्रपक्षांनी मुस्लिमांना भडकावले. त्यांच्या तुष्टीकरणाच्या धोरणामुळे स्वातंत्र्यानंतर शेजारील देशांतून आलेल्या हिंदू, बौद्ध आणि शिखांना न्याय मिळाला नाही, असा घणाघात शहा यांनी याप्रसंगी केला.

शहा म्हणाले, बांगला देशात फाळणी झाली, तेव्हा तिथे 27 टक्के हिंदू होते. आता तेथे केवळ नऊ टक्के हिंदू शिल्लक आहेत. बाकीचे हिंदू गेले कुठे? आम्ही 2019 मध्ये सीएए आणल्यामुळे कोट्यवधी हिंदू, जैन आणि शीख धर्माच्या लोकांना नागरिकत्व मिळाले. इंडिया आघाडी या विषयावरून मुस्लिमांना भडकावण्याचे काम करत आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेत नाही हे मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो. तथापि काही राज्य सरकारे यावरून लोकांची दिशाभूल करत आहेत.

अल्पसंख्याकांना मोदींनी न्याय दिला

अल्पसंख्याकांना मोदींनी न्याय दिला काँग्रेसने केवळ तुष्टीकरणाचे राजकारण केले. त्यामुळे शेजारील देशांमध्ये हालअपेष्टा सहन करत असलेल्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळाले नाही. अशा कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला. मी माझ्या सर्व निर्वासित बांधवांना सांगतो की, तुम्ही नागरिकत्वासाठी कोणताही संकोच न करता अर्ज करा. तुमचे काहीही चुकीचे होणार नाही. यामध्ये कोणत्याही फौजदारी खटल्याची तरतूद नाही, तुमचे घर, तुमची नोकरी, सर्व काही अबाधित राहील. विरोधक तुमची दिशाभूल करत आहेत, असेही शहा म्हणाले.

Indian citizenship restored to Pakistani Hindus
यूपीएससी न देताच आता होता येईल थेट अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news