शत्रूचा नाश निश्चित! स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ सैन्यात होणार दाखल, 'ही' आहेत वैशिष्ट्ये

सैन्य स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ खरेदीच्या अंतिम टप्प्यात
indian army
शत्रूचा नाश निश्चित! स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ सैन्यात होणार दाखल, 'ही' आहेत वैशिष्ट्येFile Photo
Published on
Updated on

indian army buying indigenous loitering munitions for deep strike inside enemy territory

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

भारतीय सेना स्वदेशी ‘सुसाइड ड्रोन’ म्हणजेच लोइटरिंग म्युनिशनची मोठी खेप खरेदी करण्याच्या तयारीत आहे. हे आत्मघाती ड्रोन स्फोटकांनी सज्ज असतील आणि शत्रूच्या हद्दीत घुसून त्यांच्या ठिकाणांचा पूर्णपणे नाश करतील.

indian army
आज ‘रॉकी भाई’चा वाढदिवस! बस ड्रायव्हरच्या मुलापासून KGF स्टारपर्यंतचा यशचा थरारक प्रवास..

हे ड्रोन असे असतील की, जॅमिंग (रडार सिग्नल अडवणे) आणि स्पूफिंग (खोटे रडार सिग्नल पाठवणे) अशा परिस्थितीतही ते आपले लक्ष्य अचूकपणे साध्य करू शकतील. म्हणजेच शत्रूच्या सैन्याला याची चाहूलही लागणार नाही आणि ते पूर्णपणे उद्ध्वस्त केले जातील. या मोठ्या प्रकल्पासाठी लवकरच लष्कराकडून टेंडर जारी होण्याची शक्यता आहे.

सुमारे 2,000 कोटी रुपयांचा करार

या कराराची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की, भारतीय कंपन्या देशातच डिझाइन व विकसित केलेल्या लोइटरिंग म्युनिशनचा पुरवठा करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. सुरुवातीला हा करार सुमारे 2,000 कोटी रुपयांचा असेल आणि पुढील काही वर्षांत त्यामध्ये अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे.

कारण भारतीय सेना आपल्या विविध युनिट्सना ‘सुसाइड ड्रोन’ किंवा लोइटरिंग म्युनिशनने सुसज्ज करण्याच्या योजनेवर काम करत आहे, जेणेकरून कमी अंतरावर किंवा शत्रूच्या प्रदेशात खोलवर घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान करता येईल.

indian army
तुम्ही खाताय ते बदाम खरे आहेत का? 'या' ४ पद्धतींनी ओळखा खरे-भेसळयुक्त मधील फरक

काही महिन्यांतच लष्कराला मिळणार ड्रोन

सूत्रांच्या माहितीनुसार, ही ऑर्डर पूर्ण करण्यासाठी अनेक भारतीय कंपन्या पुढे येणार आहेत. यामुळे परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला मोठी चालना मिळेल.

या ऑर्डरमुळे एक मजबूत स्वदेशी औद्योगिक इकोसिस्टम तयार होईल, ज्यामुळे लष्कराला गरज भासल्यास भारतीय कंपन्या तात्काळ अशा प्रणाली विकसित करून पुरवू शकतील.

हे टेंडर फास्ट-ट्रॅक प्रक्रियेद्वारे जारी केले जातील, जेणेकरून काही महिन्यांतच ड्रोनच्या चाचण्या घेऊन सर्वोत्तम पर्याय निवडता येईल आणि ऑर्डरही देता येईल. पारंपरिक पद्धतीने ही संपूर्ण प्रक्रिया किमान दोन वर्षे लागली असती.

लष्करासाठी ड्रोन कोणत्या कंपन्या बनवणार?

या प्रकल्पात दोन भारतीय कंपन्यांची निवड केली जाईल आणि त्यांना 60:40 या प्रमाणात ठेका दिला जाईल. ज्या कंपन्यांचे ड्रोन चाचण्यांमध्ये यशस्वी ठरतील, सर्व निकष पूर्ण करतील आणि ज्यांची बोली सर्वात कमी असेल, त्यांनाच हा ठेका मिळेल.

संरक्षण उत्पादन क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही मोठ्या भारतीय कंपन्यांनी यापूर्वीही लष्कराला अशा प्रणाली पुरवल्या आहेत. त्यामध्ये टाटा अ‍ॅडव्हान्स्ड सिस्टिम्स, अदानी डिफेन्स, सोलर डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेड आणि न्यूस्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजीज या कंपन्यांचा समावेश आहे. तसेच निबे डिफेन्स, ए व्हिजन आणि एसएमपीपी या कंपन्याही बोली प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात.

‘ईगल ऑन एवरी आर्म’ म्हणजे काय?

गेल्या वर्षी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सैन्यात ड्रोन आणि लोइटरिंग म्युनिशनचा समावेश करण्याची योजना जाहीर केली होती. त्याचबरोबर विशेष ड्रोन युनिट स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली होती. त्यांनी ‘ईगल ऑन एवरी आर्म’ (प्रत्येक सैनिकाच्या बांह्यांवर गरुड) ही संकल्पना मांडली होती. याचा अर्थ असा की, भविष्यात प्रत्येक सैनिकाला ड्रोनच्या क्षमतेने सुसज्ज केले जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news