Indian Drone Force : सैन्य दलात आता 50 हजार जवानांचा ‌‘ड्रोन फोर्स‌’

कोणत्याही लष्करी कारवाईला सर्वप्रथम प्रत्युत्तर देणार
Indian Drone Force : सैन्य दलात आता 50 हजार जवानांचा ‌‘ड्रोन फोर्स‌’
Published on
Updated on

नवी दिल्ली : ‌‘ऑपरेशन सिंदूर‌’, रशिया-युक्रेन आणि अमेरिका, इस्त्रायल-इराण युद्धांनंतर भारतीय संरक्षण संस्थेने एक खास ड्रोन तुकडी (फोर्स) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ही तुकडी कोणत्याही लष्करी कारवाईत सर्वप्रथम प्रत्युत्तर देणार असून, त्यासाठी 50 हजार लष्करी जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे.

एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या माहितीनुसार, पुढील तीन वर्षांत पंधरा नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स (उत्कृष्टता केंद्रे) तयार केली जातील. तेथे सिम्युलेटर आणि व्हर्च्युअल रिॲलिटीच्या माध्यमातून विशेष युद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे.

भविष्यात सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि इंडो-तिबेट पोलिस फोर्स (आयटीबीएफ) यासारख्या सुरक्षा दलांनाही या नेटवर्कशी जोडले जाईल. गुप्तवार्ता, पाळत ठेवणे आणि अचूक हल्ला करणे अशी तिहेरी भूमिका ही तुकडी बजावेल. या प्रणालीला वायुसेनेच्या एकात्मिक हवाई कमांड आणि लष्कराच्या ‌‘आकाशतीर‌’ प्रणालीचे कवच पुरवले जाणार आहे.

एअर कमोडोर गौरव एम. त्रिपाठी (निवृत्त) यांच्या मते, भविष्यातील ऑपरेशन्स मल्टी-डोमेन असतील. तसेच, आपल्याला ‌‘हार्डन्ड‌’ ड्रोनचा सामना करावा लागू शकतो. त्यांना जाम करणे कठीण असेल. यात उत्तम नेव्हिगेशन, जीपीएसशिवाय काम करण्याची क्षमता, इलेक्ट्रो-ऑप्टिकल होमिंग आणि एकत्रित हल्ला करण्याची ताकद असेल. यासाठी आपल्याला अँटी-ड्रोन क्षमतेचा विस्तार सर्व महत्त्वाच्या ठिकाणांपर्यंत वाढवावा लागेल. कम्युनिकेशन सिस्टीमला इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, सायबर वॉरफेअरच्या विरोधात मजबूत करावे लागेल, असे ते म्हणाले.

प्रत्येक सैनिकाकडे असणार स्वतःचा ड्रोन

या ड्रोन फोर्समधील प्रत्येक जवानाला ड्रोन चालवण्याचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार असून, युद्धभूमीवर प्रत्येक सैनिकाकडे स्वतःचा ड्रोन असावा, असे उद्दिष्ट त्यामागे आहे. याव्यतिरिक्त, सैन्याच्या प्रत्येक कोअरमध्ये 8 हजार ड्रोन समाविष्ट करण्याची योजना आहे. यातून एक लाख ड्रोनची प्रचंड शक्ती तयार होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news