Russia S-400 system | भारताला आठवड्यात मिळणार दोन रशियन एस 400 प्रणाली

Russia S-400 system |
Russia S-400 system | भारताला आठवड्यात मिळणार दोन रशियन एस 400 प्रणाली
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या हवाई संरक्षण क्षमतेत मोठी भर घालत यंदा रशियाकडून आणखी दोन एस 400 हवाई संरक्षण प्रणाली भारताला मिळणार आहेत. या प्रणाली पुढील आठवड्यात भारतात पोहोचणार असून पाचवी प्रणाली नोव्हेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे. या घडामोडी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.

ही प्रणाली रशियातून रवाना केली. भारतीय वायुदलाच्या अधिकार्‍यांनी प्री-डिस्पॅच तपासणी पूर्ण केल्यानंतर ही शिपमेंट करण्यात आली. ही नवी प्रणाली राजस्थानमध्ये तैनात केली जाण्याची शक्यता आहे. एस 400 ही दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली आहे. लांब पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना, ड्रोनना आणि क्षेपणास्त्रांना लक्ष्य करून त्यांचा नाश करण्याची क्षमता यात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news