'कू' ॲप हाेणार बंद, नेमकं काय आहे कारण?

मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियाची झाली हाेती २०२० मध्‍ये सुरुवात
koo shutting down
भारतीय मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया ॲप कू बंद होणार आहे.Twitter
Published on
Updated on

मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणारे कू ॲप आता बंद होत आहे, अशी माहिती या ॲपचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि सह-संस्थापक मायाक बिडवाटका यांनी लिंक्डइनवर शेअर केली आहे. काही काळापूर्वीपर्यंत इतर कंपन्यांशी विलीनीकरणाबाबत कराराचा संस्‍थापकांनी प्रयत्‍न केला;पण या प्रयत्‍नाना यश आले नाही. अखेर कू ॲप अधिकृतरित्‍या बंद करण्‍यात येत असल्‍याची घोषणा त्‍यांनी केली.

कू या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडियाची सुरुवात 2020 मध्ये केंद्र सरकारचे आत्मनिर्भर ॲप इनोव्हेशन चॅलेंज जिंकून करण्यात आली होती. अगदी X (पूर्वीचे Twitter) चा पर्याय म्हणून त्याच्‍याकडे पाहिले जात होते.

koo shutting down
Koo’s Twitter Handel : ट्विटरने प्रतिस्पर्धी ‘कू’चे अकाउंट केले निलंबित, निर्णयावर प्रश्‍नचिन्‍ह

विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही

मयंक बिडवटका यांनी लिंक्डइनवर लिहिले आहे की, "काही भागीदारांसोबत आमची सुरू असलेली चर्चा अयशस्वी झाली आहे. आता आम्ही आमची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करत आहोत. कंपनीने अनेक मोठ्या इंटरनेट कंपन्या आणि मीडिया समूहांसोबत भागीदारी करण्याची शक्यता देखील तपासली, परंतु त्याचे सकारात्मक परिणाम मिळाले नाहीत.तंत्रज्ञानावरील अधिकच्‍या खर्चामुळे ॲप बंद करावे लागत आहे. कंपनीने गेल्या वर्षी एप्रिलपासून कर्मचारी कमी करण्यास सुरुवात केली असल्‍याचेही त्‍यांनी आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

koo shutting down
KOO APP : फेसबुकला भारतीय पर्याय देणार्‍या ‘कू’ अ‍ॅपवर राजकारण्यांचीही गर्दी

एकेकाळी होते २१ लाख वापरकर्ते

भारतात कूच्या दैनंदिन सक्रिय वापरकर्त्यांची संख्या एकेकाळी २१ लाखांवर पोहोचली होती. यानंतर त्याला X चा पर्यायी देखील म्हटले गेले. कू या मायक्रोब्लॉगिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केंद्र सरकारची मंत्रालये , मंत्री आणि सेलिब्रिटीही उपस्थित होते. पण, जास्त किमतीच्या तंत्रज्ञानामुळे कंपनीला अखेर प्लॅटफॉर्म बंद करावा लागला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news