India Shoots Down Pakistani Drone| भारताने पाकिस्‍तानची ८ ड्राेन पाडली ! दोन फायटर JF - 17 जेट हवेतच उडवली

भारतीय सैन्याची मोठी कामगिरी | पाकिस्‍तानची दाेन विमाने पाडली
पाकिस्‍तानची क्षेपणास्‍त्रे पाडल्‍यानंतर जम्‍मूमध्ये ब्‍लॅक आऊट करण्यात आले आहे.
पाकिस्‍तानची क्षेपणास्‍त्रे पाडल्‍यानंतर जम्‍मूमध्ये ब्‍लॅक आऊट करण्यात आले आहे.
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : भारताने केलेल्‍या ऑपरेशन सिंदुरनंतर, पाकिस्‍तानने भ्‍याड हल्‍ले सुरुच ठेवले आहेत. सिमेवर अनेक ठिकाणी हल्‍ले सुरु असून आज गुरुवारी संध्याकाळी पाकिस्‍तानने पठाणकोट येथील एअरबेसवर ड्राेन डागली पण भारताच्या संरक्षणप्रणाली S - 400 यंत्रणेने ही ड्राेन हवेतच नष्‍ट केली. जम्‍मूच्या आउएसपूरा येथे ब्‍लॅकआऊट करण्यात आले आहे.

पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर आपटला आहे. सांबा येथे पाकिस्तानकदून जोरदार गोळीबार करण्यात आला. हे लक्षात घेता, जम्मूतील आरएस पुरा भागात ब्लॅकआउट लागू करण्यात आला, येथे सायरन वाजत आहेत. जम्मू शहरात मोबाईल नेटवर्क जॅम करण्यात आले. सतवारी कॅम्पवर हल्ला झाल्याची बातमी समोर आली आहे. दुसरीकडे, कुपवाडामध्येही जोरदार गोळीबार करण्यात येत आहे. यासोबतच पंजाबमधील गुरुदासपूरमध्येही ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे.

जालंदर, पठाणकोट, उधमपूर, अखनूर येथे हे ड्राेन आणि मिसाइलचा पाडण्यात आली आहेत. अशी माहीती मिळत आहेत. हवेतच हे ड्राेन नष्‍ट करण्यात आली. यानंतर जम्‍मू मध्ये युद्धसदृश्य परिस्‍थिती संपूर्ण ब्‍लॅकआऊट, सायरन एकसारखे वाजत आहेत.

राजस्थानमध्ये ३ ठिकाणी क्षेपणास्‍त्र डागण्याचे प्रयत्‍न विफल

पाकिस्तानने राजस्थान मधील प्रमुख सैन्य ठिकाणांवर केला आहे. या हल्ल्यात ड्रोन आणि मिसाइलचा वापर करण्यात आलाय. बिकानेर येथील नाल,बाडमेर येथील उत्तरलाई आणि फालोदी एयरबेसला टार्गेट करण्यात आले होते. पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्‍टीमने ही क्षेपणास्‍त्रे पाडली आहेत.

पाकिस्‍तानची दोन JF - 17 विमाने हवेतच केली नष्‍ट

भारताच्या एअर डिंफेन्स सिस्‍टीमने पाकिस्‍तानची दोन JF-17 विमाने हवेतच मारुन पाडली. जम्‍मू बॉर्डरजवळ ही कामगिरी भारताच्या संरक्षण दलांनी केली आहे. पाकिस्‍तानला २४ तासाच्या आत हा दुसरा झटका दिला आहे. विषेश म्‍हणजे ही विमाने चिनने पाकिस्‍तानला पुरवली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news