Nepal Flood Relief | पूरग्रस्त नेपाळला भारताकडून मदत सुरूच, १० टन सामग्रीची तिसरी खेप रवाना

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती
India Flood Relief To Nepal
दहा टन मदत सामग्री घेऊन तिसरे विमान शुक्रवारी (दि. २८) काठमांडूसाठी रवानाPudhari
Published on
Updated on

India Flood Relief To Nepal

नवी दिल्ली : पूरग्रस्त नेपाळला भारताची मदत सुरूच आहे. दहा टन मदत सामग्री घेऊन तिसरे विमान शुक्रवारी (दि. २८) काठमांडूसाठी रवाना झाल्याची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

या सामग्रीमध्ये पोर्टेबल जनरेटर संच, वैयक्तिक स्वच्छतेचे साहित्य, अन्नाची पाकिटे आणि पाणी शुद्ध करण्याच्या गोळ्यांचा समावेश आहे. या विमानात डॉक्टर, पॅरामेडिक्स आणि बोगद्यातील बचाव कार्यासाठीच्या विशेष पथकाचा समावेश असलेले ११ सदस्यांचे पथकही आहे, असे त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले. नेपाळमध्ये सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्याला भारताचा पाठिंबा कायम आहे, असे ते म्हणाले. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news