भारत आणि कतार मैत्री अधिक दृढ, धोरणात्मक भागीदारी संदर्भात करार

दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांतील नेत्‍यांनी केल्‍या करारांवर स्‍वाक्षरी
India-Qatar Relations
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर यांनी नवी दिल्‍ली येथील हैदराबाद हाऊसमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि कतार यांच्‍या मैत्री संबंध आज अधिक दृढ झाले. उभय देशांनी आपले संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या उपस्थितीत दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीसाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

दोन्ही देशांनी दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि उत्पन्नावरील कराशी संबंधित आर्थिक चुकवेगिरी रोखण्यासाठी सुधारित करारावर स्वाक्षरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्या उपस्थितीत कागदपत्रांची देवाणघेवाण झाली. त्यांच्या भेटीमुळे आमच्या वाढत्या बहुआयामी भागीदारीला आणखी चालना मिळेल, असा विश्‍वास परराष्‍ट्र मंत्रालयाने व्‍यक्‍त केला आहे.

मोदी आणि अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली.

पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर यांनी हैदराबाद हाऊसमध्ये अनेक द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुलरहमान बिन जसीम अल सानी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कराराची देवाणघेवाण केली. कतारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री शेख फैसल बिन थानी बिन फैसल अल थानी म्हणाले की, भारत त्यांचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार बनला आहे. गुंतवणूक आणि औद्योगिक सहकार्य आणखी मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांच्या व्यवसायांना सीमा ओलांडण्याची आवश्यकता आहे.

कतारकडून भारताला १.५ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक

एप्रिल २००० ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत कतारकडून भारताला १.५ अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) मिळाली आहे. भारत आणि कतारमधील द्विपक्षीय व्यापार २०२२-२३ मध्ये १८.७७ अब्ज डॉलर्सवरून २०२३-२४ मध्ये १४ अब्ज डॉलर्सपर्यंत कमी होण्याचा अंदाज आहे. कतारमधून भारतात होणाऱ्या प्रमुख निर्यातींमध्ये एलएनजी, एलपीजी, रसायने आणि पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम उत्पादने यांचा समावेश आहे, तर भारतातून होणाऱ्या प्रमुख निर्यातींमध्ये धान्ये, तांबे उत्पादने, लोखंड आणि स्टील उत्पादने, भाज्या, फळे, मसाले, प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने, इलेक्ट्रिकल आणि इतर यंत्रसामग्री, प्लास्टिक उत्पादने, बांधकाम साहित्य, कापड आणि कपडे, रसायने, मौल्यवान दगड आणि रबर यांचा समावेश आहे. कतार हा एलएनजी आणि एलपीजीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. याशिवाय, भारत कतारमधून इथिलीन, प्रोपीलीन, अमोनिया, युरिया आणि पॉलिथिलीनची आयात करतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news