

नवी दिल्ली ः गुप्तचर यंत्रणांकडून शोपियान जिल्ह्यातील केलर जंगलात दहशतवाद्यांची उपस्थिती असल्याची माहिती मिळाल्यानंतर, भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त पथकाने 13 मे 2025 रोजी एक मोठी कारवाई केली.
या तीव्र चकमकीत तीन कट्टर दहशतवादी ठार करण्यात आले, ज्यामध्ये LeT/TRF चा स्थानिक कमांडर देखील होता. ही तिघेही दहशतवादी दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होते. कारवाई दरम्यान AK सेरीजमधील रायफल्स, मोठ्या प्रमाणात दारुगोळा, हातगोळे, युद्धजन्य साहित्य जप्त केले आहे.
ही कारवाई सर्व सुरक्षा दलांतील उत्कृष्ट समन्वय आणि गुप्तचर यंत्रणांच्या अचूक माहितीमुळे यशस्वी झाली.
भारतीय लष्कराने स्पष्टपणे सांगितले आहे की, "दहशतवादाच्या निर्मूलनासाठी आमची वचनबद्धता अढळ आहे. शांततेला बाधा आणणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला कठोर आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल."
जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये जनजीवन सुरळीत सुरु झाले आहे. शहरात परिस्थिती सामान्य दिसते. रात्री येथे ड्रोन, गोळीबार किंवा गोळीबार झालेला नाही, असे वृत्त ANIने दिले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आज (दि.१४) भारतीय भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ 'भारत शौर्य तिरंगा यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, " आज, सैन्याबद्दल आदर आणि पंतप्रधान मोदींबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्तर प्रदेशात तिरंगा यात्रा सुरू होत आहे. संपूर्ण देश सैन्याच्या शौर्याला आणि धाडसाला सलाम करतो. संपूर्ण राज्याच्या वतीने, ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. पहलगाममध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा संपूर्ण जगाने निषेध केला. लष्कराने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही कोणालाही त्रास देणार नाही, परंतु जर कोणी आम्हाला त्रास दिला तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असा संदेशच भारताने संपूर्ण जगाला संदेश दिला आहे."
उत्तर प्रदेशमध्ये आज (दि.१४) भारतीय भारतीय सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ 'भारत शौर्य तिरंगा यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक या यात्रेत सहभागी झाले आहेत.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी मंगळवारी (दि.१३ मे) सांगितले की, "आंतरराष्ट्रीय समुदायाने पहलगाम दहशतवादी घटना भारतीय पर्यटकांना लक्ष्य करून घडली होती हे मान्य केले आहे, पाकिस्तान हाच सीमेपलीकडून दहशतवादाचे स्रोत म्हणून ओळखले जात आहे. अनेक परदेशी नेत्यांनी स्वतःचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याच्या भारताच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. दहशतवादी कारवायांचे स्रोत म्हणून पाकिस्तानची भूमिका अधोरेखित केली आहे. अनेक परदेशी नेत्यांनी, भारतीय समकक्षांशी साधलेल्या संवादावेळी स्वतःचे रक्षण करण्याचा आणि आपल्या लोकांचे रक्षण करण्याचा भारताचा अधिकार मान्य केला आहे."
India-pakistan news latest live updates : पाकिस्तानविरुद्धच्या कारवाया फक्त स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. भविष्य त्यांच्या वर्तनावर भारताची कारवाई अवलंबून असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी सोमवारी (दि. १२ मे) भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संचालन महासंचालकांदरम्यान (DGMOs) चर्चा झाली. यामध्ये दोन्ही बाजूनी एकही गोळी झाडली जाणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी चर्चा झाली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कायम आहे. जाणून घेवूया लाईव्ह अपडेट...