

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भारत आणि पाकिस्तानने एकमेकांना आपल्या आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी देवाणघेवाण करण्याचा करार ३० वर्षांपेक्षा जुना आहे. या करारानुसार दोन्ही देश दरवर्षी १ जानेवारीला त्यांच्या शस्त्रांस्त्रांची यादी एकमेकांना देतात.
भारत आणि पाकिस्तानच्या आण्विक शस्त्रांस्त्रांची यादी आणि त्यांच्याशी संबंधित इतर माहितीची देवाणघेवाण करण्याचा करार १९८८ मध्ये झाला होता. ३१ डिसेंबर १९८८ रोजी दोन्ही देशांच्या सरकारांनी या करारावर स्वाक्षरी केली आणि २७ जानेवारी १९९१ रोजी अंमलात आली. या करारानुसार भारत पाकिस्तामध्ये १ जानेवारी १९९२ रोजी शस्त्रांस्त्रांची पहिली यादी एकमेकांना देण्यात आली. तेव्हापासून दोन्ही देश दरवर्षी १ जानेवारीला ही यादी एकमेकांना देतात.