India - Pakistan Ceasefire | भारत - पाकिस्तानदरम्‍यानचा युद्धविराम १८ मे पर्यंत वाढवला

दोन्ही देशांच्या DGMOs चा निर्णय झाल्याची माहिती
India - Pakistan Ceasefire
pudhari photo
Published on
Updated on

नवी दिल्‍ली : ऑपरेशन सिंदूर नंतर झालेल्‍या भारत पाकिस्‍तान युद्धात पाकिस्‍तानने सपशेल शरणागती पत्‍कारली. त्‍यांनतर १० मे रोजी युद्धविराम जाहीर करण्यात आला. ७ मे रोजी रात्री व ८ मे नंतर भारताने केलेल्‍या जबरदस्‍त हल्‍ल्‍यात पाकिस्‍तान गारद झाला. त्‍यांच्या DGMOs भारताला फोन करुन युद्ध थांबविण्याची विनंती केली. यानंतर युद्धविराम झाला आता. दोन्ही देशांच्या DGMOs चा मध्ये चर्चा झाली असून हा युद्धविराम १८ मे पर्यंत सुरु ठेवणार आहेत.

या चर्चेदरम्यान नियंत्रण रेषेवर (Line of Control - LoC) गोळीबार थांबवणे, तणाव कमी करणे या संदर्भात चर्चा झाली. पीटीआयने दिलेल्‍या वृत्तानुसार पाकिस्‍तानचे विदेश मंत्री इशाक डार यांनी सांगितले की पाकिस्‍तानचे डीजीएमओ मेजर जनरल काशिफ अब्‍दूला व भारताचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजिव घई यांच्यात हॉटलाईन वर युद्धविरामाबाबात गुरुवारी चर्चा झाली व त्‍यात १८ मे पर्यंत सिझफायर थांबवण्याचा निर्णय झाला. तत्‍पूर्वी १२ मे ला झालेल्या दोन्ही देशांच्या डीजीएमओ च्या चर्चेनंतर १४ मे पर्यंत युद्ध विराम कायम ठेवण्यात आला होता.आता आता पाकिस्तान ने १८ मे पर्यंत हा युद्ध विराम वाढवण्यात आला असल्याचं सांगण्यात आलं.

India - Pakistan Ceasefire
India Pakistan News Live Updates : 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुम्ही जे काही केले त्याचा संपूर्ण देशाला अभिमान- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍याचा बदला घेण्यासाठी भारताने ७ मेच्या पहाटे ऑपरेशन सिंदूर राबवित पाकिस्‍तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्‍ले करत दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्‍त केले होते. यानंतर पाकिस्‍ताने भारतावर ड्रोन हल्‍ले करण्याचा प्रयत्‍न केला. पण भारताने चांगलेच प्रत्‍यत्तर देत हा हल्‍ला परतवून लावला. आता १८ मे पर्यंत सीमारेषवर गोळीबार न करणे किंवा लष्‍करी कारवाई न करणे याबाबत दोन्ही देशात सहमती झाल्‍याची माहिती मिळत आहे.

India - Pakistan Ceasefire
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर २८७ भारतीय नागरिक पाकिस्तानातून भारतात परतले

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news