India Economic Growth : जागतिक अस्थिरतेमध्येही भारताची घौडदौड : चालू व‍र्षी विकास दर ७ टक्क्यांवर : मूडीज

India GDP growth
India GDP growth | भारताचा जीडीपी 6.4 टक्क्यांनी वाढणार
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : जागतिक बाजारातील अस्थिरता आणि आर्थिक आव्हानांना मुकाबला करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्था सज्ज असल्याचे मूडीज या पत मानांकन संस्थेच्या अहवालातून पुढे आले आहे. चालू वित्तीय वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ६.५ टक्क्यांऐवजी ७ टक्के राहील, असा अंदाज मूडीजने वर्तविला आहे.

या संस्थेच्या अहवालात म्हटल्यानुसार, मजबूत उपभोगामुळे जागतिक धक्क्यांचा सामना करण्याची भारताची क्षमता वाढली आहे. उदयोन्मुख बाजारपेठांना अधिक आव्हानात्मक बाह्य परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या ऊर्जा किमती, उच्च जागतिक व्याजदर आणि सातत्यपूर्ण व्यापार व भू-राजकीय अनिश्चिततेमुळे महागाई आणि आर्थिक ताण वाढला आहे.

व्यापक आर्थिक गती आणि ऊर्जा पुरवठ्यातील धक्क्यांचा सामना करण्याची लवचिकता यामुळे हा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारताची आर्थिक वाढ मध्यम मुदतीत ७ टक्क्यांच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे, आणि खासगी गुंतवणुकीत सातत्य राहिल्यास ही वाढ आणखी वाढू शकते. भारताची सर्वसमावेशक आर्थिक गती आणि ऊर्जा पुरवठ्यातील धक्क्यांना तोंड देण्याची क्षमता असल्याचे मूडीजने म्हटले आहे.

अन्य अहवालही दिलासादायक

भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मूडीजखेरीज अन्य आंतरराष्ट्रीय वित्तसंस्थांनीही दिलासादायक अहवाल प्रसारित केले आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), एडीबी (ADB) आणि एस अँड पी ग्लोबल रेटिंग्जने ७ टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे; तर फिच रेटिंग्जने भारताचा जीडीपी ६.९ टक्के वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढ ७.१ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.