अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून होणार्‍या तेल आयातीत 25 टक्के कपात

भारताला फटका; रुपयाऐवजी डॉलरमध्ये व्यवहार
india-cuts-russian-oil-imports-by-25-percent-under-us-pressure
अमेरिकेच्या दबावामुळे रशियाकडून होणार्‍या तेल आयातीत 25 टक्के कपात.Pudhari File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाकडून केली जाणारी तेल खरेदी कमी करून अमेरिकेकडून वाढवावी, यासाठी भारताला दिलेल्या प्रस्तावामुळे फेब्रुवारी महिन्यात रशियाकडून होणार्‍या तेलाच्या आयातीत 25 टक्क्यांनी कपात झाली. तर, अमेरिकेडून होणार्‍या इंधन आयातीत 100 टक्के वाढ झाली. अमेरिकडून 25 अब्ज डॉलरच्या ऊर्जा खरेदीला दिलेल्या मान्यतेचा हा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

रशियाच्या अर्थव्यवस्थेत इंधन तेलाची निर्यात हा महत्त्वाचा स्रोत आहे. त्यावर युक्रेनच्या युद्धानंतर कुर्‍हाड चालवण्याचा प्रयत्न अमेरिकेने चालवला होता. मात्र, रशिया डॉलरऐवजी रुपया या चलनात इंधन विक्री करण्यास तयार झाला. त्यामुळे रशिया भारताचा मुख्य पुरवठादार बनला होता. भारतात रशियाकडून होणारी इंधन तेलाची आयात जानेवारी महिन्यात 14 लाख बॅरल प्रतिदिन इतकी होती, ती घटून 1 फेब्रुवारीपासून 10 लाख 70 हजार बॅरल (प्रतिदिन) इतकी झाली. तर, अमेरिकेकडून होणारी आयात एक लाख दहा हजार बॅरल प्रतिदिन होती, ती दोन लाख बॅरल प्रतिदिन इतकी झाली असल्याचे ‘एनर्जी कार्गो ट्रॅकर व्होेर्टेक्सा’च्या अहवालात म्हटले आहे.

भारतात सौदी अरेबियाकडून होणार्‍या तेल आयातीत 7 लाख 70 हजार बॅरल प्रतिदिनवरून 9 लाख 10 हजार बॅरल प्रतिदिन इतकी वाढ झाली आहे. संयुक्त अरब अमिरातकडून होणारी तेल आयात 4 लाख 80 हजार बॅरलवरून 3 लाख 10 हजार बॅरल प्रतिदिन इतकी कमी झाल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शुद्धीकरण कंपन्यांनाही रशियन तेल नकोसे

भारतातील तेलशुद्धीकरण कंपन्याही अमेरिकन निर्बंधांच्या भीतीने रशियन पुरवठ्याऐवजी अमेरिका, मध्य पूर्वेतील देशांना पसंती देत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर अमेरिकेकडून ऊर्जा खरेदी लक्षणीय वाढवण्याचे मान्य करण्यात आल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी सांगितले होते. याशिवाय रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास अमेरिकेकडून या कंपन्यांवर अधिक निर्बंध लादले जातील, अशी भीती तेलशुद्धीकरण कंपन्यांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news