Agni missile : अग्नीच्या प्रगत क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, एकापेक्षा जास्त अणुबॉम्ब नेण्याची क्षमता

अनेक लक्ष्यांवर एकदम मारा करणे शक्य
India conducts successful flight trial of advanced variant of Agni missile
Published on
Updated on

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने शुक्रवारी ओडिशातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून अग्नी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. डीआरडीओने शनिवारी ही माहिती दिली.

या क्षेपणास्त्रामध्ये मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड रीएंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) प्रणाली बसवण्यात आली आहे. यामुळे एकाच वेळी अनेक अणुबॉम्ब वाहून नेता येतात. तसेच एकाच वेळी अनेक लक्ष्यांना लक्ष्य करता येते.

चाचणीदरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या अनेक लक्ष्यांना क्षेपणास्त्राने यशस्वीरीत्या भेदले. ही सर्व लक्ष्ये हिंद महासागर क्षेत्रात पसरलेली होती. मीडिया रिपोर्टनुसार, हे भारताचे दुसरे इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता सुमारे 5 हजार ते 7 हजार किलोमीटरपर्यंत आहे. याचा वेग इतका जास्त आहे की, शत्रूच्या रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी ते रोखणे जवळ जवळ अशक्य आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news