भारत-कॅनडाचे संबंध बिघडले

भारताने उच्चायुक्तांना परत बोलावले
India-Canada relations deteriorated
भारत-कॅनडाचे संबंध बिघडलेPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा

भारताने कॅनडातील आपले उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत बोलावले आहे. हरदीपसिंग निज्जर हत्या प्रकरणात वर्मा आणि इतर मुत्सद्दींचा सहभाग असल्याचा कॅनडाचा आरोप भारताने ठामपणे फेटाळला आहे. भारताने हे आरोप निरर्थक आणि राजकीय अजेंड्याचा भाग असल्याचे म्हटले आहे.

India-Canada relations deteriorated
पाकिस्तानातील 'शाघांय परिषद' बैठकीला भारताचे परराष्ट्र मंत्री राहणार उपस्थित

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, कॅनडाच्या उच्चायुक्तांनाही बोलावून सांगण्यात आले आहे की कॅनडातील भारतीय उच्चायुक्त आणि इतर मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना निराधार लक्ष्य करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, अतिरेकी आणि हिंसाचाराच्या वातावरणात कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो सरकारच्या कृतींमुळे त्यांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी सध्याच्या कॅनडाच्या सरकारच्या वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर लक्ष्यित मुत्सद्दी आणि अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे.

India-Canada relations deteriorated
२०७० पर्यंत भारत दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे भाकीत

भारताविरुद्ध अतिरेकी, हिंसाचार आणि फुटीरतावादाला ट्रूडो सरकारच्या समर्थनाविरोधात भारत पावले उचलू शकतो, असे कॅनडाच्या उच्चायुक्तांना मंत्रालयाने सांगितले आहे. भारतीय मुत्सद्दींना लक्ष्य करणे हा योगायोग नसल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रूडो सरकार संकुचित राजकीय फायद्यासाठी सातत्याने भारतविरोधी फुटीरतावादी अजेंड्यालाही प्रोत्साहन देत असल्याचे भारताने म्हटले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news