India Bullet Train | २०२७ मध्येभारताच्या बुलेट ट्रेनची चाचणी: ताशी २८० किमी वेग गाठणार!

भारतीय बनावटीची ही बुलेट ट्रेन बी-२८ या नावाने विकसित
AI Genreted Image
AI Genreted Image
Published on: 
Updated on: 

Bullet Train Latest Update नवी दिल्ली : भारतातील बहुप्रतीक्षित बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या पूर्णत्वास वेग येत आहे. मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गासाठी तयार होत असलेल्या देशातील पहिल्या स्वदेशी बुलेट ट्रेनच्या रुळांवरील चाचण्या २०२७ च्या मध्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही ट्रेन चाचणीदरम्यान ताशी २८० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. २०२७ च्या अखेरीस सुरत ते वापी या पहिल्या टप्प्यावर प्रवासी सेवा सुरू करण्याचे रेल्वेचे नियोजन आहे.

भारतीय बनावटीची ही बुलेट ट्रेन बी-२८ या नावाने विकसित केली जात आहे. बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड आणि चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी यांच्या माध्यमातून ट्रेनची निर्मिती सुरू आहे. ट्रेनची पहिली बॉडी फ्रेम तयार झाली असून तिच्या संरचनात्मक चाचण्या सुरू आहेत. चाचण्या आणि आवश्यक सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिक सेवेसाठी ती उपलब्ध होईल. या ट्रेनची कमाल चाचणी क्षमता ताशी २८० किलोमीटर असली, तरी सुरुवातीच्या व्यावसायिक सेवेत तिचा नियोजित वेग ताशी २४९ किलोमीटर असेल. त्यामुळे चाचणीतील वेग आणि प्रवासी सेवेत वापरला जाणारा वेग यामध्ये फरक असणार आहे.

AI Genreted Image
Mumbai-Ahmedabad bullet train cost doubles -बुलेट ट्रेन प्रकल्पाचा खर्च दुपटीने वाढला !

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गाची एकूण लांबी ५०८ किलोमीटर आहे. या मार्गावर टप्प्याटप्प्याने सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. सुरत ते वापी हा पहिला टप्पा असेल. त्यानंतर उर्वरित मार्गावरील काम पूर्ण होत जाईल, तशी सेवा मुंबईपर्यंत विस्तारित केली जाणार आहे. संपूर्ण मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई ते अहमदाबाद हे अंतर फक्त एक तास ५८ मिनिटांत पार करता येईल, असा रेल्वेचा अंदाज आहे.

२०१७ मध्ये भारत आणि जपान यांच्या सहकार्याने या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. जमीन अधिग्रहण, परवानग्या आणि कोरोना महामारीमुळे प्रकल्पाच्या कामाला विलंब झाला. आता स्वदेशी ट्रेनची निर्मिती आणि मार्गावरील पायाभूत सुविधांची कामे वेगाने पुढे जात असल्याने २०२७ हे वर्ष भारतीय रेल्वेच्या इतिहासात महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.