

India Blocks 'Global Times' X Account : राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण होईल, अशी चुकीची माहिती आणि कंटेंटचा प्रसार केल्या प्रकरणी भारताने चीनच्या सरकारी मीडिया ग्लोबल टाईम्सच्या एक्स अकाउंटचा ॲक्सेस ब्लॉक केला असल्याचे वृत्त 'ANI'ने दिले आहे.
ग्लोबल टाईम्स हे चीनच्या सरकारचे मुखपत्र आहे. अत्यंत आक्रमकपणे चीनच्या सरकारची बाजू मांडण्यासाठी ते जगभरात कुख्यात आहेच. आता या मुखपत्राने आपल्या एक्स अकाउंटवरुन ब्लॉक करण्यामागे विशिष्ट कारण अधिकृतपणे पुष्टी केलेले नसले तरी ही कारवाई भारताने शत्रु राष्ट्रांकडून भारताच्या अपप्राचाराला अंकुश लावण्याच प्रकार आहे.
चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या आश्रयाखाली काम करणारे ग्लोबल टाईम्स अनेकदा भारतावर टीका करणारे आणि बीजिंगच्या भू-राजकीय भूमिकेशी जुळणारे कथा प्रकाशित करते. त्याच्या सामग्रीवर चुकीची माहिती पसरवल्याबद्दल वारंवार टीका झाली आहे, विशेषतः २०२० च्या गलवान संघर्षासारख्या वाढत्या भारत-चीन तणाव निर्माण झाला असताना ग्लोबल टाईम्सने अत्यंत निराधार माहिती देत भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न केला होता.