लेबनॉनमधील इस्लामिक कट्टरपंथी संघटना 'हिज्ब उत तहरीर'वर भारतात बंदी | Hizb ut-Tahrir

तामिळनाडूत अटकसत्रानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाचा निर्णय
Hizb ut-Tahrir banned in India
इस्लामिक कट्टरपंथी संघटना हिज्ब उत तहरीरवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. PUDHARI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेबनॉनसह जगभरातील ३० देशांत कार्यरत असलेल्या इस्लामिक कट्टरपंथी संघटना हिज्ब उत तहरीरवर भारतात बंदी घालण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 'हिज्ब उत तहरीरी' या संघटनेला दहशतवादी ठरवलेल आहे. Hizb ut-Tahrir

Unlawful Activities Prevention Act (UAPA) मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहमंत्रायलाने यासंदर्भात एक्स पोस्ट केलेली आहे. "ही संघटना दहशतवादी कारवायांत गुंतलेली आहे. तसेच तरुणांना भडकवून त्यांना दहशतवादी कारवायांत सहभागी होण्यासाठी प्रेरित करते," असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.

भारताच्या अंतर्गत सुरक्षेला धोका | Hizb ut-Tahrir

या निर्णयाबद्दल नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही संघटना दहशतवादी कारवायांसाठी निधी गोळा करत असल्याचा उल्लेख नोटिफिकेशनमध्ये आहे. भारतातील लोकशाही पद्धतीने सत्तेत आलेले सरकार उलथून टाकणे आणि खिलापतची स्थापना करणे, असा संघटनेचा हेतू आहे. भारताच्या सुरक्षेसाठी ही संघटना धोकादायक आहे, असेही यात म्हटले आहे. (Hizb ut-Tahrir)

राष्ट्रीय तपास संस्थेने काही दिवसांपूर्वी या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांना तामिळनाडूमध्ये अटक केली होती. त्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

Hizb ut-Tahrir banned in India
चिंताजनक! दहशतवाद पुण्याच्या वेशीवर!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news