Chandipura Virus : गुजरातेत चांदिपुरा विषाणूचा प्रादुर्भाव! 6 मुलांचा मृत्यू, डासांमुळे होतो आजार

केवळ 9 ते 14 वयोगटातील मुलांना विषाणू करतो संक्रमित
Chandipura virus
गुजरातेत चांदिपुरा विषाणूची लागण होऊन गेल्या 5 दिवसांत 6 मुलांचा मृत्यू झाला आहे.Twitter
Published on
Updated on

अहमदाबाद, वृत्तसंस्था : Chandipura Virus : गुजरातेत चांदिपुरा विषाणूची लागण होऊन गेल्या 5 दिवसांत 6 मुलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यातील 12 मुलांना या विषाणूची लागण झाली आहे. हा विषाणू फक्त 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना संक्रमित करतो, हे विशेष!

गुजरातचे आरोग्यमंत्री हृषीकेश पटेल यांनी आरोग्य विभागाला अलर्टवर राहण्याचे निर्देश दिले आहेत. बाधित 12 मुलांपैकी 4 साबरकांठा, 3 अरवली, 1 महिसागर, 1 खेडा आणि 2 राजस्थान, तर 1 मुलगा मध्य प्रदेशातील आहे. सर्व मुलांवर गुजरातमधील वेगवेगळ्या रुग्णालयांतून उपचार सुरू आहेत. (Chandipura Virus)

चांदिपुरा व्हायरसमुळे (Chandipura Virus) मुलांमध्ये ताप आणि फ्लूसारखी लक्षणे दिसतात. आजार बळावल्यास मेंदूला सूज येऊ शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतो. हा विषाणू फ्लेबोटोमाईन माशी, गोचिड, एडिस डासांच्या माध्यमातून पसरतो. हा विषाणू संसर्गजन्य नाही. रुग्ण आढळलेल्या परिसरातील 4 हजार 487 घरांतून आवश्यक ती स्वच्छता करण्यात आली आहे. सध्या या विषाणूवर कोणताही इलाज सापडलेला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news