Kollam murder case | पत्नीच्या निर्घृण हत्येची कबुली दिली फेसबुक लाईव्हवर

गुन्ह्याची कबुली देत थेट पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण
Kollam murder case
Kollam murder case | पत्नीच्या निर्घृण हत्येची कबुली दिली फेसबुक लाईव्हवर (Pudhari File Photo)
Published on
Updated on

कोल्लम : कोल्लम जिल्ह्यातील पुनलूर येथे सोमवारी सकाळी एका महिलेला तिच्या पतीने धारदार शस्त्राने ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेनंतर आरोपीने फेसबुक लाईव्हवर गुन्ह्याची कबुली देत थेट पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण केले. मृत महिलेची ओळख शालिनी (निवासी - कुथनाडी, प्लाचेरी, वळक्कोडू, कोल्लम) अशी झाली आहे.

ती खासगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. आरोपी इसाक (42) सकाळी साडेसहाच्या सुमारास शालिनीच्या घरात घुसला आणि धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. शेजार्‍यांनी आरडाओरड ऐकून धाव घेतली, पण तोपर्यंत शालिनीचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी सांगितले की, वैवाहिक वाद आणि संशयातून हा हल्ला करण्यात आला. घटनेनंतर दोन मिनिटे अर्ध्या फेसबुक लाईव्हमध्ये इसाकने पत्नीची हत्या केल्याचे सांगितले.

त्यात त्याने शालिनीवर परपुरुषसंबंध, मुलाकडे दुर्लक्ष आणि घर सोडण्याचे आरोप केले. तसेच तिच्या नोकरीवर जाण्याला विरोधही व्यक्त केला. शालिनी आणि इसाक काही महिन्यांपासून वेगवेगळे राहत होते. इसाकने व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर पळ काढला, मात्र सकाळी नऊ वाजता पोलिस ठाण्यात हजर झाला. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक तपासणी सुरू असून दोघांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news