

पुढारी ऑनलाईन डेस्क: सोनं हे फक्त धातू नाही, तर जगभरातील संस्कृती, सत्ता आणि संपत्तीचं प्रतीक आहे. इतिहासात राजे-महाराजे सोन्याच्या झगमगाटात न्हालेलं साम्राज्य उभारायचे, तर आजच्या काळात अब्जाधीश गुंतवणूकदार ते सामान्य गृहिणींपर्यंत प्रत्येकासाठी सोनं ही सुरक्षिततेची हमी बनली आहे. (World’s largest gold holders)
सोन्याचं मोल केवळ दागिन्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाही; संकटाच्या काळात आर्थिक स्थैर्य देणारं, चलन अवमूल्यनाविरुद्ध बळ देणारं आणि गुंतवणुकीसाठी विश्वासार्ह पर्याय असं सोन्याचं स्थान आज निर्माण झालं आहे. सध्या जगात सर्वाधिक सोनं कोणाकडे आहे? आणि भारताचं या यादीत स्थान कुठे आहे? हे जाणून घेऊया...
World Gold Council च्या मते, आजपर्यंत सुमारे 2,16,265 टन सोनं खणून काढण्यात आलं आहे. हे सोनं सरकार, बँका, कंपन्या आणि खासगी व्यक्तींकडे आहे. फायनान्शियल एक्सप्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देश सोन्याचा साठा (टनमध्ये)
अमेरिका------ 8134 टन
जर्मनी--------- 3352 टन
चीन -----------2280 टन
भारत---------- 876 टन
हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल – पण सरकारपेक्षा भारतीय कुटुंबांकडे सर्वाधिक सोनं आहे! अंदाजानुसार:
भारतीय कुटुंबांकडे 24000 टन सोनं आहे
तर चिनी कुटुंबांकडे सुमारे 20000 टन सोनं आहे
अमेरिकन गुंतवणूकदार जॉन पॉलसन हे खासगीरित्या सर्वाधिक सोनं साठवणाऱ्यांपैकी एक आहेत. अमेरिकन डॉलर भविष्यात कमकुवत होईल, म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोन्यात गुंतवणूक केली आहे. एकेकाळी ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळासाठीही त्यांचं नाव चर्चेत होतं.
कॅनडियन अब्जाधीश एरिक स्प्रॉट 90 टक्के गुंतवणूक सोनं व चांदीत केली आहे.
जॉर्ज सोरोस यांनी SPDR Gold Trust आणि Barrick Gold Corp ETFs मध्ये प्रत्येकी 264 दशलक्ष डॉलर गुंतवले आहेत.
Rich Dad Poor Dad पुस्तक मालिकेचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांचा सल्ला हे नेहमीच सोनं (physical gold) विकत घ्या.
सौदी अरेबियाचं शाही घराणं देखील मोठ्या प्रमाणात सोनं ठेवतं. तेलाच्या संपत्तीमुळे (काळं सोने), House of Saud या सुमारे 15000 सदस्यांच्या घराण्याकडे 1.4 ट्रिलियन डॉलर संपत्ती आहे, ज्यात सोन्याचाही मोठा हिस्सा आहे.