मालकही आणि भाडेकरूही! स्वतःचं घर असूनही लोक रेंटच्या फ्लॅटमध्ये का शिफ्ट होत आहेत?

आजची पिढी ‘भाडेकरू’ होणं का पसंत करते? रिअल इस्टेटचं बदलतं स्वरूप नेमकं काय आहे?
काय आहे ‘रेंट-वेस्टिंग’चं गणित?
मालकही आणि भाडेकरूही! स्वतःचं घर असूनही लोक रेंटच्या फ्लॅटमध्ये का शिफ्ट होत आहेत?File Photo
Published on
Updated on

home but live on rent smart real estate move

पुढारी ऑनलाईन :

आपल हक्काच छोट का असेना पण घरा असाव. हे प्रत्‍येकाच स्वप्न असतं. मात्र सध्याच्या काळात घराच्या व्याख्या वेगाने बदलायला लागल्या आहेत. नव्या पिढीला आज फक्त घर नको आहे तर बऱ्याच गोष्टीची अपेक्षा आहे.

काय आहे ‘रेंट-वेस्टिंग’चं गणित?
अंगावर ५ कोटींचे सोने, तरीही निश्चिंत! बाबा म्हणाले, ‘देवावर विश्वास.., केसालाही लागणार नाही धक्का..’

कालपर्यंत जे घर यशाचं अंतिम ठिकाण मानलं जायचं, ते आज फक्त एक ‘स्मार्ट गुंतवणूक’ बनलं आहे. कदाचित म्हणूनच आधुनिक पिढी स्वतःच्या नावावर असलेलं घर भाड्याने देऊन, स्व:त भाड्याच्या लक्झरीमध्ये आपली नवी ओळख शोधत आहे.

एक काळ असा होता की घर म्हणजे फक्त ‘डोक्यावरच छत’ आणि चार भिंती. पण बदलत्या काळासोबत घर आता केवळ राहण्याची जागा न राहता, आपली लाइफस्टाइल आणि ओळखीचा भाग बनलं आहे. आजच्या धावपळीच्या आयुष्यात लोकांच्या प्राथमिकता झपाट्याने बदलल्या आहेत. आता फक्त घर नको, तर ‘स्पेस’ आणि ‘लक्झरी’ हवी आहे.

काय आहे ‘रेंट-वेस्टिंग’चं गणित?
BMC निवडणुकीतील सर्वात अटीतटीचा सामना : काँग्रेसने भाजपचा केवळ 7 मतांनी केला पराभव

अनेकजण कष्टाने कमावलेल्या पैशातून स्वतःसाठी घर घेतात, पण काही वर्षांतच कुटुंबाच्या वाढत्या गरजा किंवा अधिक चांगल्या सुविधांची इच्छा यामुळे तेच घर लहान वाटू लागतं. अशावेळी एक नवा आणि स्मार्ट ट्रेंड जोर धरतो आहे. लोक आपली मौल्यवान मालमत्ता विकण्याऐवजी किंवा तिथे कोंडून राहण्याऐवजी ती भाड्याने देत आहेत आणि स्वतःसाठी मोठं व आलिशान घर भाड्याने घेत आहेत. मग प्रश्न असा की, मालमत्ता असूनही आजची पिढी ‘भाडेकरू’ होणं का पसंत करते? रिअल इस्टेटचं बदलतं स्वरूप नेमकं काय आहे?

काय आहे ‘रेंट-वेस्टिंग’चं गणित?

हा ट्रेंड जागतिक पातळीवर ‘Rentvesting’ म्हणून ओळखला जातो. रेंट-वेस्टिंग ही एक आर्थिक रणनीती आहे, ज्यात तुम्ही जिथे परवडेल तिथे घर खरेदी करता, बहुतेक वेळा शहराच्या बाहेरील भागात किंवा लहान घर. पण राहता मात्र तिथे जिथे तुमच्या लाइफस्टाइलच्या गरजा पूर्ण होतात. उदा. ऑफिसजवळ किंवा पॉश परिसरात.

उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीचं गुरुग्राम सेक्टर-92 मध्ये स्वतःचं 2BHK फ्लॅट आहे. तो तो फ्लॅट ₹25,000 भाड्याने देतो आणि स्वतः गोल्फ कोर्स रोडवर ऑफिसजवळ ₹45,000 देऊन 3BHK भाड्याने राहतो. अशा प्रकारे तो आपल्या घराच्या भाड्याचा आणि EMI चा समतोल साधतो, आणि तरीही आवडत्या लोकेशनवर राहतो.

हा ट्रेंड लोकप्रिय का होत आहे?

बेंगळुरू, मुंबई, दिल्ली-एनसीआरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ट्रॅफिक ही मोठी समस्या आहे. अनेकदा लोकांचं स्वतःचं घर ऑफिसपासून 2 तासांच्या अंतरावर असतं. त्यामुळे लोक आपलं घर भाड्याने देऊन ऑफिसजवळ भाड्याने राहणं पसंत करतात. यामुळे वेळ वाचतो आणि जीवनमान सुधारतं.

आजची पिढी एका ठिकाणी बांधून राहू इच्छित नाही. नोकरी बदल किंवा शहर बदलल्यास स्वतःचं घर विकणं किंवा रिकामं ठेवणं अवघड ठरतं. भाड्याने राहिल्यामुळे त्यांना ‘फ्लेक्सिबिलिटी’ मिळते. ‘नाइट फ्रँक इंडिया’ (Knight Frank India) च्या अहवालानुसार, तरुणांमध्ये आता ‘मालकी’पेक्षा ‘वापराचा अधिकार’ (Access) अधिक महत्त्वाचा ठरत आहे.

प्रॉपर्टीचे दर गगनाला भिडले आहेत. दक्षिण दिल्ली किंवा दक्षिण मुंबईत 3BHK खरेदी करणं आज मध्यमवर्गीय प्रोफेशनलसाठी स्वप्न ठरू शकतं. मात्र तिथे ₹60,000 ते ₹80,000 दरम्यान भाड्याने राहणं शक्य आहे. स्वतःचं छोटं घर भाड्याने दिल्यावर मिळणारी रक्कम मोठ्या घराच्या भाड्याचा भार कमी करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news